तुमच्या मागे काही करंटे लोक लागले, पण तुम्ही त्यांना चोख उत्तर दिले

राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी सरनाईकांकडून धडा घ्यावा.
They should compete for Pratap Sarnaik's public works : Thackeray
They should compete for Pratap Sarnaik's public works : Thackeray

मीरा-भाईंदर : तुमच्या मागे काही करंटे लोक लागलेले असतानादेखील तुम्ही जरासुद्धा न डगमगता सेवेचा वसा शिवसेना आणि शिवसैनिकांच्या जिद्दीप्रमाणे जनतेच्या हितासाठी जपत काम करीत आहात. आपल्या कामाच्या माध्यमातून आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. जे कोणी सरनाईक यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करत असतील आणि आहेत. त्यांनी सरनाईक यांच्या लोकोपयोगी कामाची स्पर्धा करून दाखवावी, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले. (They should compete for Pratap Sarnaik's public works : Thackeray)
 
मीरा-भाईंदर येथे विहंग चरिटेबल ट्रस्ट आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यातून ऑक्सिजन प्लँट उभारण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. या वेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक व इतर मान्यवर मीरा भाईंदर येथे व्यासपीठावर उपस्थित होते. त्या कार्यक्रमात ठाकरे यांनी आमदार सरनाईक यांच्यावर ईडीकडून होणाऱ्या कारवाईसंदर्भात सूचक भाष्य केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, आजपर्यंत आपण क्रिकेटच्या सामन्यात आपण स्लेजिंग बघत आलो आहोत. एखादा बोलर्स आणि बॅट्समन चांगली कामगिरी करत असेल तर आजूबाजूला असं काही करायचं की त्यामुळे त्याचे लक्ष विचलित करायचे. बोलर्सची लेंथ आणि लाईन बिघडवयाची आणि बॅट्समनचेही असेच लक्ष विचलित केल्यास तो आऊट होतो. असाच काहीसा घाणेरडा प्रकार आता राजकीय क्षेत्रातही येत चाललेला आहे. पण, आमदार प्रताप सरनाईक यांनीसुद्धा त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी सरनाईकांकडून धडा घ्यावा. अनेक संकटे आले तरी आपल्या कर्तव्यापासून दूर न जाता ती कशी पार पाडावीत, हे त्यांनी दाखवून दिले आहे.  

जनतेने आपल्याला जो आशीर्वाद दिलेला आहे. त्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही. पण, ते अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण व्यक्त करू शकतो. जनतेच्या ऋणातून मुक्त होता येत नसले तरी ऋण व्यक्त करणे, हे जनतेच्या सेवेची एक दिशा म्हणता येईल. सध्या सर्व निधी कोरोना महामारीमुळे आरोग्यावर खर्च होतो आहे. त्यात नैसर्गिक आपत्तीही एका मागून एक आपल्या मागे लागलेली आहे. त्यामुळे सरकारकडून आमदरांना निधी कमी मिळतो आहे, असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये, कारण हे सरकार आपले आहे, असे ठाकरे यांनी बोलताना स्पष्ट केले.

पहिल्या लाटेत शिवसेना नगरसेवक आणि मीरा भाईंदर महापालिकेतील गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचा वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला. एक पत्रकाराचाही मृत्यू झाला. त्याचवेळी मी ठरविले होते की ऑक्सिजनसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपणच ऑक्सिजन प्लँट उभारून ती सुविधा  मतदारसंघातील अणि शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्यास ते चांगले होईल. त्यातूनच हा प्लँट उभारला आहे. आमच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून प्लँटसाठीची सामग्री परदेशातून मागवली आहे. मीरा भाईंदरचा आज लोर्कापण होत आहे, ठाण्यातील प्रकल्पाचे गोकुळ अष्टमीच्या मुहुर्तावर लोकार्पण होईल, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले. 

ते म्हणाले की, ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये प्रशासनाकडून कोरोनाविरोधात चांगले काम केले जात आहे. मीरा भाईंदर पालिकेला उत्पन्नाचे स्त्रोत नाहीत, त्यामुळे शासकीय निधीवर अवलंबून राहावे लागते. गेल्या वर्षी ठाकरे कलादानासाठी निधी दिला होता, त्याचे काम सुरू आहे. अठरा महिन्यांत ते पूर्ण करण्याचा आयुक्तांचा मानस आहे. आहे. मुख्यमंत्र्यांच्या इच्छेप्रमाणे ऑलिंपिकच्या नियमाप्रमाणे शहरात जलतरण तलावाचीही निर्मिती केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com