ठाण्यातील बड्या नेत्याचा शिवसेनेला जय महाराष्ट्र !

जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा कोणत्या कारणामुळे दिला. हे मात्र गुलदस्त्यात आहे.
Thane Zilla Parishad member Suresh Mhatre resigned from Shiv Sena membership
Thane Zilla Parishad member Suresh Mhatre resigned from Shiv Sena membership

भिवंडी  ः ठाणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सदस्य सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी शिवसेना पक्ष सदस्यत्वासह जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे आज (ता. २९ मे) शनिवारी दिला. म्हात्रे यांच्या राजीनाम्यामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (Thane Zilla Parishad member Suresh Mhatre resigned from Shiv Sena membership)

म्हात्रे यांनी शिवसेनेच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला, हे एकवेळ समजू शकते. मात्र, त्यांनी ठाणे जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा कोणत्या कारणामुळे दिला. हे मात्र गुलदस्त्यात आहे. यापूर्वी सुरेश म्हात्रे यांनी जिल्हा परिषदेत शिवसेनेचे गटनेते म्हणूनही काम केले आहे

दरम्यान, शिवसेनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारतीय जनता पक्षातून पुन्हा शिवसेनेत दाखल झालेले म्हात्रे हे आता कोणत्या पक्षात जाणार, याची चर्चा भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यात सुरू झाली आहे.

लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याने पक्षश्रेष्ठींसह शिवसेना नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे सुरेश म्हात्रे यांच्यावर तीव्र नाराज झाले होते. म्हात्रे यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी कारवाई म्हणून त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपविली नव्हती. शिवसेनेच्या या दुर्लक्षित धोरणामुळे आणि कोंडी करण्याच्या भूमिकेमुळे सुरेश म्हात्रे हेही पक्षावर नाराज होते. 

अखेर आपले वैयक्तिक कारण पुढे करत सुरेश म्हात्रे यांनी शिवसेना सदस्यपदाबरोबरच आपल्या जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे म्हात्रे यांच्या घरी आले होते, तेव्हापासूनच ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे आता ते कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com