नोटिसा मिळताच भिवंडीच्या त्या 18 नगरसेवकांची अजितदादांच्या भेटीसाठी धावपळ 

नोटीस मिळाल्यानंतर रविवारी दुपारी 18 नगरसेवकांपैकी 5 जण कोकण विभागीय कार्यालयात हजर झाले होते.
As soon as the notice of the Konkan Divisional Commissioner was received, the 18 corporators from Bhiwandi rushed to meet Ajit Pawar
As soon as the notice of the Konkan Divisional Commissioner was received, the 18 corporators from Bhiwandi rushed to meet Ajit Pawar

भिवंडी : नगरसेवक पद वाचविण्यासाठी भिवंडी महापालिकेच्या 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नाराज झालेले कॉंग्रेसचे नेते अशोक जगताप यांनी बंडखोर 18 नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. 

दरम्यान, कोकण विभागीय आयुक्तांनी संबंधित 18 नगरसेवकांना नोटिसा देऊन याबाबतची सुनावणी सुरू केली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी धावपळ सुरू केली आहे. 

भिवंडी महापालिकेच्या तीन वर्षांपूर्वीच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी घोडेबाजाराला बळी पडून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे कॉंग्रेसच्या उमेदवार रिषिका राका यांचा पराभव झाला होता, त्यामुळे 18 फुटीर नगरसेवकांचे पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेसचे नगरसेवक जावेद दळवी यांनी नवी मुंबई-कोकण विभागीय आयुक्त भाऊसाहेब मिसाळ यांच्याकडे केली होती. त्यामुळे या नगरसेवकांना रविवारी (ता. 3 जानेवारी) कार्यालयात बोलावून आयुक्तांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

दरम्यान, सर्व कागदपत्रांची तपासणीची पूर्तता करून उद्या (ता. 5 जानेवारी) पुन्हा सुनावणीसाठी हजर राहावे, असा आदेश नगरसेवकांना कोकण आयुक्त मिसाळ यांनी दिल्याने नगरसेवकांच्या गटात खळबळ उडाली आहे. त्यानंतर नगरसेवकांनी अजित पवारांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवारास मतदान केले होते. त्यामुळे पक्षाच्या उमेदवार रिषिका प्रदिप राका यांचा पराभव झाला होता. पक्षादेश झुगारून विरोधकांना मदत करणाऱ्या या नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी कॉंग्रेसचे नगरसेवक दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यामुळे 18 नगरसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. 

नोटीस मिळाल्यानंतर रविवारी दुपारी 18 नगरसेवकांपैकी 5 जण कोकण विभागीय कार्यालयात हजर झाले होते. त्यांचे म्हणणे कोकण विभागीय आयुक्त भाऊसाहेब मिसाळ यांनी ऐकून चार्शिट केले. कागदपत्रे तपासणीसाठी वेळ हवा आहे, अशी मागणी वकिलांनी केल्याने या 5 नगरसेवकांना उद्या मंगळवारी पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

या नगरसेवकांवर पद रद्द होण्याची टांगती तलवार 

1) श्रीमती नमरा औरंगजेब अन्सारी, 2) श्रीमती मिस्बा इमरान खान, 3) इमरान वली मोहमद खान, 4) अहमद हुसेन मगृ सिद्धीकी, 5) अरसद मो. असलम अन्सारी, 6) श्रीमती शबनम महबूब रहमान असारी, 7) श्रीमती अझुम अहमद हुसेन सिद्धीकी, 8) मलिक अ नजीर अ मोमीन, 9) श्रीमती जरीना नफीस अन्सारी, 10) श्रीमती. साजेदा बानो इश्‍तियाक मोमीन, 11) श्रीमती शकिरा बानो इम्तियाज अहमद शेख, 12) श्रीमती समिना सोहेल शेख, 13) श्रीमती राबिया मो. शमीम अन्सारी, 14) तफजूल हुसेन मकसूद हुसेन अन्सारी, 15) श्रीमती शिफा अशफाक अन्सारी, 16) नसरुल्ला नूर मोहम्मद अन्सारी, 17) श्रीमती हुस्ना परवीन मोह. याकूब अन्सारी, 18) मतलुब अफझल खान. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com