आरक्षणाच्या लढाईत राजे-बीजे कोणी नाही : राणेंचा संभाजीराजेंना टोला

आरक्षणाच्या मुद्यावर राजा-प्रजा सगळे एकत्र होऊया.
Round table conference on Maratha reservation issue at Vashi
Round table conference on Maratha reservation issue at Vashi

नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी कोणालाही नेता करा. तेथे नारायण राणे असणारच. आरक्षणाच्या मुद्यावर राजा-प्रजा सगळे एकत्र होऊया. भविष्यासाठी समाजाला आरक्षण  मिळवून देऊ या. आरक्षणासाठी लढा देत असताना राजे-बिजे काही नाही. सर्वजण समान आहेत, असा सांगून राज्‍यसभेचे खासदार नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे खासदार संभाजीराजे छत्रपतींना टोल लगावला. (Round table conference on Maratha reservation issue at Vashi)

वाशी येथील माथाडी भवन येथे राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद शुक्रवारी (ता. २५ जून) घेण्‍यात आली. त्या परिषदेत राणे बोलत होते. ‘‘मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या सर्व समित्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन लढा दिल्‍यास आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही. मात्र, त्यांच्यात समन्वय नसल्याने आरक्षण रखडले आहे. केंद्र सरकारने घटनेतील १०२ कलमात दुरुस्ती केल्यामुळे राज्य सरकारचे आरक्षणाबाबतचे अधिकार काढले गेले आहेत. हा राज्य सरकारचा दावाच धादांत खोटा आहे,’’ असा दावा राणे यांनी केला.

हेही वाचा : विनापरवाना आंदोलन करणे ५ आमदार, २ माजी खासदारांसह २० हजार जणांना पडले महागात 
 
ज्या समाजांना राज्याने आरक्षण दिले. त्यावेळी मुख्यमंत्रिपदावर मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते. मराठा आमदार जास्त संख्येने होते. मात्र, त्यांनी वेळोवेळी मंजूर झालेल्या आरक्षणाला कधीच विरोध केला नाही. मात्र, ज्‍यावेळी मराठा आरक्षण लागू झाले. त्या वेळी मात्र इतरांकडून का विरोध केला जातो, असा सवालही राणे यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षणाच्या लढाईत कोणालाही नेता करा. त्या लढाईत नारायण राणे सहभागी होईल. मराठा आरक्षण मी मंजूर केले, तेव्हा कोणी विरोध केला नव्हता. या लढाईत राजा प्रजा सगळे एकत्र होऊया. भविष्यासाठी आरक्षण देऊ या, असे आवाहनही त्यांनी केले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही विविध संघटनांमध्ये विखुरलेल्या मराठा समाजाला एकाच व्यासपीठावर येण्याचे आवाहन केले. आमदार प्रसाद लाड, माथाडी नेते नरेंद्र पाटील, मराठा समाज आरक्षण समन्वयक सुरेश पाटील आदी उपस्थित होते. पाच जुलैपासून मराठा आरक्षणासाठी रणनीती आखून सर्व पद्धतीने लढा उभारण्यात येईल, असे त्‍यांनी जाहीर केले.

आठवले यांच्या भूमिकेला विरोध

केंद्रीय राज्‍यमंत्री रामदास आठवले यांनी काव्यशैलीत मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला. मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल, तर सरसकट देशातील सर्व क्षत्रियांना आरक्षण देण्याची भूमिकाही आठवले यांनी मांडली. मात्र राणे यांनी आठवले यांच्या विधानाला विरोध केला आणि हा मुद्दा आरक्षण भरकटवून नेईल, असे स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com