The highest number of corona patients were found in Thane district on Thursday | Sarkarnama

कोरोना रुग्णांच्या उच्चांकी संख्येने ठाणे जिल्हा हादरला 

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 2 जुलै 2020

ठाणे जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. त्यात गुरुवारी (ता. 2 जुलै) जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली महापालिकेत कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. त्यात गुरुवारी (ता. 2 जुलै) जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली महापालिकेत कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात बाधित रुग्ण एक हजार 921 आढळले आहेत. दिवसभरात 31 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 36 हजार 567 तर, मृतांची संख्या 1 हजार 130 वर जाऊन पोचली आहे. 

या वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येसह, वाढत्या मृत्यूमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात गुरुवारी सर्वाधिक 560 रुग्णांसह, चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 7 हजार 485 तर, मृतांची संख्या 127 इतकी झाली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 395 बाधितांची तर, 11 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या 9 हजार 530 तर, मृतांची संख्या 352 जाऊन पोचली आहे. 

 

नवी मुंबई महापालिकेत 265 रुग्णांची तर, सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. येथील कोरोना बाधितांची संख्या 7 हजार 88 तर, मृतांची संख्या 224 वर पोहोचली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात 88 बाधितांसह 2 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोरोना बाधितांची संख्या 2 हजार 111 तर, मृतांची संख्या 114 वर पोचली आहे. मीरा भाईंदरमध्ये 171 कोरोना बाधित रुग्णांची तर, चार जणांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. एकूण कोरोना बाधितांची संख्या 3 हजार 609 तर, मृतांची संख्या 149 इतकी झाली आहे. 

उल्हासनगर 174 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोना बाधितांची संख्या 2 हजार 156 झाली आहे. अंबरनाथमध्ये 63 रुग्णांची तर, एका जणाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यामुळे शहरात कोरोना बाधितांची संख्या एक हजार 931 तर, मृतांची संख्या 52 झाली आहे. 

बदलापूर शहरात 51 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 858 वर जाऊन पोचली आहे. ठाणे ग्रामीण भागात 154 रुग्णांची तर, दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे एकूण कोरोना बाधितांची संख्या एक हजार 799 तर, मृतांची संख्या 50 वर गेली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख