राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेशाबाबत गणेश नाईक म्हणतात....

भाजपचा प्रकल्प असतानाही नाईकांनी केलेल्या टीकेनंतर ते राष्ट्रवादीत जात असल्याच्या अफवा उठल्या.
Ganesh Naik says about joining NCP
Ganesh Naik says about joining NCP

नवी मुंबई : "मी केलेल्या वक्तव्याचा विरोधकांनी विपर्यास केला. एखाद्या प्रश्‍नाबाबत भूमिका मांडली म्हणजे त्याचा अर्थ पक्ष सोडणे असा होत नाही', अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशावर स्पष्टीकरण दिले. 

सानपाडा रेल्वे स्थानकाच्या समोरील वाहनतळाच्या जागेत सिडकोतर्फे गृहप्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यावर नाईकांनी सडकून टीका केली होती. हा भाजपचा प्रकल्प असतानाही नाईकांनी केलेल्या टीकेनंतर ते राष्ट्रवादीत जात असल्याच्या अफवा उठल्या होत्या. 

तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान देवेंद्र फडणवीस यांच्या काळात नवी मुंबईतील रेल्वे स्थानक आणि ट्रक-टर्मिनसच्या मोकळ्या जागेवर सिडकोतर्फे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प राबवणाऱ्या अधिकाऱ्यांना डोके नाही का, अशी टीका नाईकांनी केली होती. 

ही टीका समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नाईक लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती, परंतु दोन दिवसांपूर्वी नेरूळ येथे झालेल्या एका इमारतीच्या पुनर्बांधणीच्या भूमिपूजनाप्रसंगी नाईकांनी राष्ट्रवादी प्रवेशाच्या वृत्तावर स्पष्टीकरण देत विरोधकांची टर उडवली. 

एखादी भूमिका मांडली म्हणजे पक्ष सोडतो, असा कोणी सोयीस्कररीत्या अर्थ काढत असेल तर तो त्यांनी काढावा, आमचे काही म्हणणे नाही, असे नाईकांनी स्पष्ट केले आहे. नाईकांच्या या स्पष्टीकरणानंतर आता प्रवेशाच्या चर्चेवर पडदा पडला. 

अधिकाऱ्यांनी गंगेत जाऊन प्रायश्‍चित्त घ्यावे 

सिडकोच्या ज्या अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण प्रकल्पाचे नियोजन केले आहे, त्यांच्या पदवीबाबत शंका निर्माण होते. तत्कालीन अधिकाऱ्यांनी हितसंबंध जपले आहेत, असा आरोप नाईक यांनी केला आहे. तसेच, ज्या अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांनी गंगेत जाऊन आपल्या पापाचे प्रायश्‍चित्त करावे, अशा शब्दांत त्यांनी उद्विग्नता व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com