मोठी बातमी : माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक - ED arrests ex MLA Vivek Patil in Karnala Bank scam | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

मोठी बातमी : माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 15 जून 2021

आणखी बड्या नेत्यांना अटक होण्याची शक्यता... 

मुंबई : शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. कर्नाळा सहकारी बॅकेच्यै गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्या वाहनांची जप्ती या आधी झाली होती. आता थेट अटक झाल्याने गुंतवणूकदारांच्या लढ्याला यश मिळण्याची चिन्हे आहेत. 

कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेत सुमारे 540 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. त्याबद्दल राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू होता. 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा असल्याने अंमलबजावणी संचालनालयाला त्याच्या तपासाचा अधिकार मिळतो. त्यानुसार चौकशी सुरू होती. त्याचे पर्यवसान अटकेत झाले. त्यांना रात्री पावणेनऊच्या सुमारास राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.

वाचा ही बातमी : नारायण राणे हे दिल्लीला गेलेच नाहीत... 

या प्रकरणी गुंतवणूकदारांना न्याय मिळावा म्हणून रिझर्व्ह बॅंकेवर मोर्चा काढण्यात आला होता. तसेच या घोटाळ्यातील आरोपांनी शिक्षा होण्यासाठी मागणी करण्यात आली होती. मात्र विवेक पाटील यांना महाविकास आघाडी सरकार वाचवत असल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला होता. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीदेखील या प्रकरणी तक्रारी केल्या होत्या. पाटील यांच्या मालमत्तेवर या आधीच टाच आणण्यात आली आहे. त्यांच्या गाड्यादेखील जप्त करण्यात आल्या आहेत. सहकार खात्यामार्फत या गैरव्यवहाराची चौकशी गेल्या दोन वर्षांपासून सुरू होती. शेकापने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असल्याने पाटील यांना वाचविले जात असल्याचा भाजपचा आरोप होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख