गणेश नाईकांची एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दमबाजी

या बैठकीत एमआयडीसीतील पाणी, मोकळे भूखंड, रस्ते आदी पायाभूत सुविधांबाबत चर्चा झाली.
Don't give the water of Navi Mumbai to another city : Ganesh Naik
Don't give the water of Navi Mumbai to another city : Ganesh Naik

नवी मुंबई : एमआयडीसीतील झोपडपट्टी आणि अन्य रहिवासी भागात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करा. नवी मुंबईच्या वाट्याला आलेले पाणी दुसरीकडे वळवल्यास सोडणार नाही, अशा शब्दांत ऐरोलीचे भारतीय जनता पक्षाचे आमदार गणेश नाईक यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली. एमआयडीसी भागातील प्रश्न सोडवण्याबाबत नाईक यांनी एमआयडीसीतील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत एमआयडीसीतील पाणी, मोकळे भूखंड, रस्ते आदी पायाभूत सुविधांबाबत चर्चा झाली. (Don't give the water of Navi Mumbai to another city : Ganesh Naik)

एमआयडीसीतील दिघा, आंबेडकरनगर, रबाळे, महापे, पावणे, तुर्भे, आदी भागात पाणीटंचाई आहे. नवी मुंबईकरीता एमआयडीसी ३५ एमएलडी पाणीपुरवठा करते. मात्र, हा पाणीपुरवठा ३५ एमएलडीवरून २५ एमएलडी करण्यात आला आहे. मोरबे धरणामुळे नवी मुंबईतील उर्वरित भागांना चोवीस तास पाणी आणि एमआयडीसीतील भागांना आठवडयातून एक ते दोन दिवस पाणी हे चालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

एमआयडीसीकडून नवी मुंबई शहराला होणाऱ्या पाणी कोट्यातील काही टक्के पाणी हे मिरा-भाईंदर शहराकडे वळविण्यात येते आहे. याबाबत नाईक यांनी सडेतोड भूमिका मांडली. इतर शहरांना पाणीपुरवठा करा पण, नवी मुंबईच्या वाट्याला झळ लावू देणार नाही, तसे करण्याचा प्रयत्न झाल्यास मोर्चा आणू, असा इशाराही आमदार गणेश नाईक यांनी या वेळी बोलताना दिला. 

एमआयडीसीतील डिकेसी ते महापे व तुर्भे सविता केमिकल्स या ठिकाणी सेवा रस्त्यांवर एमआयडीसीने बार, हॉटेल्स आदी वाणिज्यिक कारणांसाठी भूखंड दिल्याने वाहतुक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. ही भूखंडविक्री रद्द करून ज्या कारणासाठी सेवा रस्ते बांधण्यात आले आहेत, त्याच कारणांसाठी त्यांचा वापर झाला पाहिजे, असे आमदार नाईक यांनी अधिकाऱ्यांना निक्षून सांगितले. एमआयडीसी भागात नवी मुंबई महापालिका विविध सुविधा पुरविते. ट्रक टर्मिनस, टेम्पो स्टॅन्ड, शाळा, सौचालये, रूग्णालये, पोलीस चैकी अशा सोयींसाठी भूखंडांची आवश्यकता असते. त्यांचे महापालिकेकडून पैसे मागण्याची पद्धत चुकीचे असल्याचे गणेश नाईक यांनी ठामपणे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com