विनापरवाना आंदोलन करणे ५ आमदार, २ माजी खासदारांसह २० हजार जणांना पडले महागात 

अशा आरोपांसह विविध कलमांखाली एनआरआय पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
Crime filed against 20,000 people for agitating Without permission for the name of the airport
Crime filed against 20,000 people for agitating Without permission for the name of the airport

नवी मुंबई  : विमानतळाच्या नामकरणासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (ता. २४ जून) सिडको घेराव आंदोलन करण्‍यात आले. मात्र, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नसताना तसेच, मनाई आदेश लागू असूनही आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी आंदोलनाचे आयोजक, आजी-माजी आमदार, खासदारांसह जवळपास २० हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. (Crime filed against 20,000 people for agitating Without permission for the name of the airport)

कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना आंदोलनकर्त्यांनी कोणतेही सुरक्षित अंतर न ठेवता गर्दी केली. अनेकांनी मास्कही घातले नव्हते, अशा आरोपांसह विविध कलमांखाली एनआरआय पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 

गुन्हे दाखल झालेल्‍या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार जगन्नाथ पाटील, आमदार गणपत गायकवाड, आमदार प्रशांत ठाकूर, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, उरणचे आमदार महेश बालदी, कल्याण-डोंबिवलीचे आमदार राजू पाटील, माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी आमदार सुभाष भोईर, रमेश पाटील, रामचंद्र घरत, माजी आमदार योगेश पाटील, माजी आमदार संदीप नाईक, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमल, उपमहापौर जगदीश गायकवाड, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, दशरथ भगत, सरचिटणीस भूषण पाटील, दीपक म्हात्रे, सुरेश पाटील, खजिनदार जे. डी. तांडेल, संतोष केणी, नीलेश पाटील, रूपेश धुमाळ, रवी भोईर, रेखा घरत, सीमा घरत आदींचा समावेश आहे. 

विनापरवाना ड्रोनद्वारे शूटिंग

आंदोलनाच्या ठिकाणी विनापरवाना ड्रोनद्वारे शूटिंग केल्याचा ठपका आयोजक व आंदोलनात सहभागी झालेल्यांवर ठेवण्यात आला आहे. आयोजकांनी किल्ला सिग्नल ते एनआरआय कॉम्पलेक्सदरम्यानच्या रोडवरील विजेचे खांब आणि झाडांवर मोठ्या प्रमाणात फलक व झेंडे लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केले. तसेच, सभास्थळी व परिसरात पाण्‍याच्या रिकाम्या बाटल्या, नाश्त्याची रिकामे पाकिटे, कागदी पत्रावळ्या टाकून केरकचरा केल्‍याचाही ठपका ठेवण्‍यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com