भाजप आमदार गायकवाडांच्या मुलाला ३९ लाखांना गंडविले - BJP MLA Ganpat Gaikwad's son cheated by software developer | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

भाजप आमदार गायकवाडांच्या मुलाला ३९ लाखांना गंडविले

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

आमदार गायकवाड यांनीही त्याचा सत्कार करीत त्याचे काम जाणून घेतले होते. 

डोंबिवली : कल्याण पूर्वचे भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांचा लहान मुलगा प्रणव गायकवाड याची ३९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. प्रणव गायकवाड याच्या कंपनीत काम करणाऱ्या सॉफ्टवेअर डेव्हलपर आशीषकुमार चौधरी याने ही फसवणूक केली आहे. त्याच्याविरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. शुक्रवारी) गुन्हा दाखल केला आहे. चौधरी याने अशी अनेक जणांची फसवणूक केल्याची शक्यता असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. (BJP MLA Ganpat Gaikwad's son cheated by software developer)

आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा प्रणव याची मायक्रोनेट एंटरप्राइजेस फर्म आहे. कल्याण येथेच राहणारा आशीषकुमार चौधरी याने आपण गुगलमध्ये संपूर्ण देशात तिसरे आल्याचे सांगितले. त्या वेळी अनेक मान्यवरांनी त्याचा सत्कारही केला होता. आमदार गायकवाड यांनीही त्याचा सत्कार करीत त्याचे काम जाणून घेतले होते. 

हेही वाचा : नारायण राणेंनी मानले देवेंद्र फडणवीसांचे आभार

त्यावेळी चौधरी याने ईआरपी सॉफ्टवेअर शिक्षणाकरिता डेव्हलप करू शकतो, असे सांगितले होते. त्यामुळे त्याला कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून रुजू करून घेण्यात आले होते. आशीषकुमार चौधरी याने त्यावेळी एक डेमो तयार करून ते सॉफ्टवेअर डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्था व जळगाव विद्यापीठ यांना विकत असल्याचेही सांगितले होते. त्यासाठी बनावट ई-मेल तयार करून जळगाव विद्यापीठाबरोबर बनावट करारपत्र करून ते कंपनीला सादर केले होते. या सर्व कामासाठी २०१८ ते २०२० या कालावधीत त्याने कंपनीकडून ३९ लाख २० हजार रुपये घेतले आहेत. 

आशीषकुमार चौधरी हा गायकवाड याच्याकडे सतत काही ना काही कामासाठी पैशांची मागणी करू लागल्याने चौकशी केली असता, त्याने फसवणूक केल्याचे आमच्या लक्षात आले, असे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख