भिवंडी महापालिकेच्या लिपिकास 24 हजारांची लाच घेताना पकडले 

महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनसुद्धा दुर्लक्ष केले जात असल्याने नगरसेवकसुध्दा त्रस्त झाले आहेत.
Bhiwandi Municipal Corporation clerk caught taking bribe of Rs 24,000
Bhiwandi Municipal Corporation clerk caught taking bribe of Rs 24,000

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या कर वसुली विभागात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यास 24 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने आज (ता. 11 जानेवारी) ही कारवाई केली. या प्रकारामुळे भिवंडी महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. 

महेंद्र मोहिते असे लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो भिवंडी महापालिकेच्या प्रभाग समिती पाचमध्ये सफाई कामगार आहे. करवसुली विभागात प्रभारी घरपट्टी वसुली लिपिक पदावर कार्यरत आहे. या प्रभागात राहत असलेल्या अश्‍फाक नावाच्या इसमाकडून घरपट्टी नाव बदली करण्यासाठी मोहिते याने 24 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. 

या संदर्भात संबंधिताने ठाणे लाच लुचपत विभागाशी संपर्क साधला होता लाच लुचपत विभागाने मनपाच्या प्रभाग पाच कर विभागाच्या कार्यालयात सापळा रचून मोहिते यास रंगेहाथ अटक केली. या घटनेनंतर प्रभाग समिती पाचमधील अधिकारी तेथून पळून गेले. भिवंडी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

दरम्यान, कर वसुली विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभार सुरू असून कर वसुली करण्याऐवजी पालिकेचे कर्मचारी व अधिकारी स्वतःची वसुली करण्यात गुंतले आहेत, अशी ओरड नेहमी होत असते. याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनसुद्धा दुर्लक्ष केले जात असल्याने नगरसेवकसुध्दा त्रस्त झाले आहेत. असे असतानाच आज (ता. 11 जानेवारी) दुपारी पालिकेच्या प्रभाग समिती 5 मध्ये घरपट्टी वसुली लिपिक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यास लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com