नाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी मुलगा-मुलगी यातील भेदभाव कमी करण्यासाठी पालक व ग्रामस्थांचे प्रबोधन सुरु केले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून पेठ या आदिवासी तालुक्यात बेटी बचाव - बेटी पढाव अंतर्गत `माझ्या मुलीचे बारसे` हा उपक्रम सुरु केला आहे.
या उपक्रमांत अंगणवाडी सेविका मदतनीस व पर्यवेक्षिका नव्याने जन्माला आलेल्या बालिकेच्या घरी स्वतः जातील. यावेळी त्या घराची सजावट करुन पालकासोबत आनंदसोहळा साजरा करणार आहेत. यानिमित्ताने होणारे मुलीच्या जन्माचे स्वागत चर्चेचा विषय ठरला आहे.
अंगणवाडी कामकाजासंदर्भात अर्थात कुपोषित बालक, स्तनादामाता, गर्भावती माता , किशोरवयीन मुलींना नियमित आहार दिला जातो का? यांसह कृपोषणासंदर्भात काय उपाययोजना केल्या जातात याबाबत करांजळी (पेठ) येथे अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिकांची सभापती आहेर यांनी घेतली. या आढावा बैठकीत कुपोषण एक मुठ पोषण,अंगणवाडी सेविका-मदतनीम रिक्तपदे, अंगणवाडी इमारत बांधकामे व दुरुस्ती, बाल व माता मृत्यू, दिव्यांग बालक आणि विविध महिला सक्षमीकरणाचे प्रशिक्षण, पोषण आहार वाटाप, बेटी बचाव बेटी पढावो, माझी कन्या भाग्यश्री आदी योजनांचा आढावा घेण्यात आला. त्याच प्रमाणे भरती प्रक्रिया कशी रबावली जावी याची माहिती सभापतींनी दिली. करंजाळी येथे महिला व मुलीच्या शिवणकर्तन व व्यूटीपार्लर प्रशिक्षणाचा शुभारंभ यावेळी सभापती आहेर व पेठच्या माजी सभापती सौ. पुष्पा गवळी यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रकल्पात सध्या महिला व मुलीच्या सक्षमीकरणासाठी शिवणकर्तन व फॅशन डिझाईन, ब्युटीपार्लर, कराटे प्रशिक्षण आदी उपक्रम सुरु आहेत. त्यात 248 महिला व मुलोंना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणात जास्तीत महिला व मुलींनी सहभाग घेवून तांत्रिक व व्यावसायिकदृष्या प्रशिक्षित व्हावे. त्याचा त्यांना भविष्यात आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी लाभ होणार आहे. नारी ही अबला न राहता सबला होणे गरजेचे आहे, असे सभापती यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना सांगितले.
सभापती भास्कर गावित यांनी कोवीड काळात आपल्या महिला व बालविकास विभागाने अतिशय उत्कृष्ट कामकाज केले. अगणवाडी सेविका- मदतनीस यांच्या सहकार्यामुळेच बालकांचे कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे ही बैठक अंगणवाडीच्या कामकाजाचा आढावा नसुन सभापती आहेर यांनी अंगणवाडी सेविकांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेली मार्गदर्शन कार्यशाळा आहे, असे सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी श्रीमती नम्रता जगताप, सहायक गरविकास अधिकारी श्री. भूसारे , बालविकास प्रकल्प अधिकारी विलाम कवळे यांसह दिडशे सेविका उपस्थित होत्या.
...

