पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसचे विश्वासघात आंदोलन - Yoyth Congress Agitation against Petrol hike at Nandgao. Congress Politics | Politics Marathi News - Sarkarnama

पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसचे विश्वासघात आंदोलन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

इंधनाची दरवाढ सातत्याने सुरु आहे. पेट्रोल शंभरीच्या घरा त पोहोचले आहे. दुसरीकडे शेतकरी, ग्रामीण भागाला महागाईने त्रस्त केले आहे. ही स्थिती म्हणजे सामान्यांना संकटात लोटण्याचे काम सरकारने केले आहे.

नांदगाव :  इंधनाची दरवाढ सातत्याने सुरुच आहे. पेट्रोल शंभरीच्या घरा त पोहोचले आहे. दुसरीकडे शेतकरी, ग्रामीण भागाला महागाईने त्रस्त केले आहे. ही स्थिती म्हणजे सामान्यांना संकटात लोटण्याचे काम सरकारने केले आहे. हा जनतेशी केलेला विश्वासघात आहे, असा आरोप युवक काँग्रेसतर्फे करण्यात आवा आहे.

आज यासंदर्भात नांदगाव येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात `अब की बार पेट्रोल,डिझेल के भाव 100 के पार`या घोषणा देण्यात आल्या.                    

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, माजी आमदार अँड. अनिलदादा आहेर, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती आर्कि. अश्विनीताई आहेर  यांच्या सूचनेनुसार तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे यांच्या नेतूत्वाखाली आंदोलन करण्यात आले. घरगुती स्वयंपाकाचा गॅस   आणि इंधन दरवाढीविरोधात  न्यायडोंगरी येथे   त्रिमूर्ती पेट्रोल पंपाच्या आवारात हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारचा  निषेध करण्यात आला. तहसीलदारांच्या वतीने न्यायडोंगरीचे मंडळाधिकारी श्री. नरोटे यांनी आंदोलनस्थळी  येऊन निवेदन स्विकारले. 

केंद्र सरकार दररोज इंधन दरवाढ करीत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घऱगुती बजेट विस्कळीत झाले आहे. महागाई वाढत चाललाीआहे. केंद्र सरकारने ही राक्षसी इंधन दरवाढ रोखण्याबाबत त्वरित पावले टाकावीत अन्यथा युवक काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्री. सुर्वे यांनी दिला. 

यावेळी दर्शन आहेर, रावसाहेब शेलार, निरंजन आहेर, किशोर गडाख, आनंद आहेर, किशोर गडाख, रवि शिंपंकर, अतुल बोरसे, महेश आहेर, भास्कर सोळसे, विकी आहेर, पावन हुचे, प्रसाद लगडे, गणेश बाचकर, बापू लागडे, रवि खटके, राहुल जाधव, चेतन आहेर आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
....

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख