युवांमध्ये बदल घडवून आणण्याची शक्ती

जीवनाच्या कठीण काळात चांगली पुस्तक आयुष्यात मदत करतात. युवा नेतृत्व उद्याच्या भारताचे भविष्य असून प्रत्येक युवांमध्ये बदल घडवून आणण्याची शक्ती आहे. स्वप्नाचे वस्तुस्थितीत रूपांतर करताना कष्ट घ्यावे लागतात.
Sachin Patil
Sachin Patil

नाशिक : जीवनाच्या कठीण काळात चांगली पुस्तक आयुष्यात मदत करतात. (Books helps us in hard time of life) युवा नेतृत्व उद्याच्या भारताचे भविष्य (young leadership is India`s Future) असून प्रत्येक युवांमध्ये बदल घडवून आणण्याची शक्ती आहे. (Every youth hade a capacity to bring change )स्वप्नाचे वस्तुस्थितीत रूपांतर करताना कष्ट घ्यावे लागतात. कष्ट घेताना भान विसरून प्रयत्न करावे लागतात. आपल्यातील गुणांना, प्रतिभेला चालना द्या, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील (Scahin Patil) यांनी रविवारी येथे केले. ‘यिन'अधिवेशनात त्यांनी शॅडो कॅबिनेटशी संवाद साधला.

श्री. पाटील म्हणाले, की तुम्ही आज जे काही करता आहात, त्यात प्रयत्न चालू ठेवा. तुम्ही ज्या गोष्टी अनुभवता त्या गोष्टी तुम्हांला आयुष्यभर वाट दाखवत असते. अनुभवातून जे गुण आलेले असतात ते लपून राहत नाहीत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आई-वडिलांनी आधार देत विश्वास द्या. आयुष्य तुमची परीक्षा घेत असते. त्यातून बाहेर आल्यानंतर स्वतः वर विश्वास ठेवा. तसेच प्रशासनात काम करत असताना अनेक लोकांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल केले. एखादी वस्तू मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन त्यावेळी नव्हते. विषय जाणून घ्यायचा असेल तर त्या विषयाच्या प्रेमात आपण पडले पाहिजे.

नातेवाइकांचे शब्द बोचायचे
स्पर्धा परीक्षांची तयारी केली. दोन ‘टर्म’ दिल्या पण अपयश पदरी आले होते. अपयश खूप काही शिकवून जाते. हातात आलेला घास जेव्हा हातातून जातो, तेंव्हा मनाची तयारी करणे कठीण होते. हे क्षेत्र जमणार नाही असे वाटले होते. नापास झाल्यानंतर नातेवाइकांचे ते शब्द बोचायचे. त्यावेळी ठरवले या शब्दांच्या पायऱ्या करून वर चढलो. तिसऱ्या ‘टर्म'मध्ये चांगली ‘रॅंक’ आली. आज तुमच्यासमोर आहे. पाण्यात पडला आहात तर पोहूनच बाहेर पडा, असे श्री. पाटील यांनी सांगितले
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com