युवक कॉंग्रेसने विचारले, "कहां गये वो 20 लाख करोड ?'

पंतप्रधानांनी घोषणा केलेले वीस लाख कोटी गेले कुठे? हा सामान्यांचा प्रश्‍न आहे. त्यासाठी येत्या 14 ऑगष्टला सर्व भाजप कार्यालये, लोकप्रतिनिधींची भेट घेऊन, त्यांनीच भाजपच्या वरिष्ठांना "कहा गये वो वीस लाख करोड?' हे विचारावे असा आग्रह धरला जाईल.
युवक कॉंग्रेसने विचारले, "कहां गये वो 20 लाख करोड ?'

 नाशिक : सबंध देश कोरोनाशी संघर्ष करीत असतांना त्यांच्यात एकटेपणाची भावना आहे. सामान्य नागरिक, व्यावसायिक, संस्था कोरोनाशी संघर्ष करीत असतांना त्यांना केंद्र शासनाकडून कोणतेही प्रोत्सहन, अर्थसाह्य, मदत मिळालेली नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी घोषणा केलेले वीस लाख कोटी गेले कुठे? हा सामान्यांचा प्रश्‍न आहे. त्यासाठी येत्या 14 ऑगष्टला सर्व भाजप कार्यालये, लोकप्रतिनिधींची भेट घेऊन, त्यांनीच भाजपच्या वरिष्ठांना "कहा गये वो वीस लाख करोड?' हे विचारावे असा आग्रह केला जाणार आहे. 

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ही राज्यव्यापी मोहिम वजा आंदोलन सुरु झाले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी लघु व मध्यम उद्योगक्षेत्रातील व्यवसायिकांशी संवाद साधत वीस लाख कोटींच्या पॅकेजमधून काही लाभ मिळाले का? याची माहिती घेतली. यातून छोटे व्यापारी व उद्योजकांना काहीच मिळाले नसल्याने पॅकेजची घोषणा ही पोकळ होती असे चित्र आहे. 

जीएसटी मध्ये सूट न मिळाल्यामुळे व्यापारी वर्ग नाराज आहे. करसंकलन पूर्वीसारखेच आहे. जे वीस लाख कोटीमध्ये कर्ज आहे, ते देखील व्याजासह परत करायचे आहे. मग यात मदत अशी काहीच नाही. कुठल्याही व्यापाऱ्याला कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मोदी सरकार आल्यापासून अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. मोदी फक्त घोषणा करतात. मोठमोठे आकडे सांगतात. मात्र प्रत्यक्षात काही मिळाले, असे आजवर कधीच झाले नाही, असा उद्योजकांचा एकूण सूर होता. यावेळी युवक कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून आणि पत्र लिहून उद्योजकांच्या मागण्या समोर ठेवल्या आहेत. दररोज एका घटकाला भेटून त्यांच्या मागण्या सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत. पुढील दोन दिवसात नोकरदारांच्या काय अडचणी आहेत? बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली? याची शहानिशा करून युवक कॉंग्रेस मोदी सरकारच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणार आहे. 
... 
लघु व मध्यम उद्योगक्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. सरकारने आर्थिक मदत आणि "जीएसटी'मध्ये सवलत देणे गरजेचे होते. ती सुद्धा दिली गेली नाही. शेवटी शेतकऱ्यांप्रमाणेच लघु व मध्यम उद्योजकांच्या तोंडास पाने पुसण्यात आली आहेत. कोटींचे पॅकेज हा सुद्धा जुमलाच होता हे आता सिद्ध झाले आहे.

- सत्यजीत तांबे, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस. 
 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=oEJfDyarqkIAX-7626e&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=3a1d891f4eb11eec9bda32c8a212f221&oe=5F5887A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com