पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात तीन पोलिस अधिका-यांना अवैध दारु भोवली! - Yeola police station suspended due illigal liquer sale | Politics Marathi News - Sarkarnama

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात तीन पोलिस अधिका-यांना अवैध दारु भोवली!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला पोलिस ठाण्यावर डॅशींग जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांची वक्रदृष्टी पडली. या पोलिस ठाण्यातील वरिष्ठांना अवैध धंद्यांकडे केलेला कानाडोळा चांगलाच भोवला आहे.

नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला पोलिस ठाण्यावर डॅशींग जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांची वक्रदृष्टी पडली. या पोलिस ठाण्यातील वरिष्ठांना अवैध धंद्यांकडे केलेला कानाडोळा चांगलाच भोवला आहे. योथील दोन्ही वरिष्ठ पोलिस अधिका-यांवर निलंबनाची कारवाई झाली. तर अन्य एकाची बदली करण्यात आली.

ही कारावई चर्चेत आहे. त्याचे कारणही तसेच घडले. अगदी चित्रपटाच्या तथेला साजेसे. येथील एका शेतकरी दाम्पत्याने अवैध धंदे सुरु असल्याने सामान्य नागरिक, शेतकरी कसे त्रस्त आहेत, याची व्यथा मांडणारी तक्रार केली. विशेषतः येवला तालुक्यातील या शेतकऱ्याने थेट नव्यानेच रुजू झालेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना फोन करून त्यांचा मुलगा अवैध दारू धंद्यामुळे वाया गेला आहे. त्यामुळे म्हातारपणात शेतकरी पती-पत्नीवर वाईट दिवस आल्याचे सांगितले. या दांपत्याने येवला तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याने कुटुंब कसे बरबाद होत आहे, याची कर्मकहाणी ऐकविली. पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांनी त्याची गंभीर देखल घेण्याचे आश्वासन त्यांना दिले. त्यानंतर त्यांनी या घटनेची खातरजमा केली. अवैध धंद्याच्या तक्रारी असल्यास संबंधित पोलिस ठाण्याचा प्रभारी जबाबदार धरला जाईल, असा इशारा त्यांनी यापूर्वी दिला होता. ही सूचना देऊनही अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करणारे येवल्यातील पोलिस अधिकाऱ्यांना महागात पडली. नवनियुक्त पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दणका देत दोघांना निलंबित केले, एकाची मुख्यालयात बदली केली. 

श्री. पाटील यांनी त्वरीत खातरजमा करताना पथक पाठवून तेथील अवैध धंद्यावर कारवाई करीत अवैध धंदा बंद केलाच; पण कार्यक्षेत्रात अवैध धंदे सुरू ठेवल्याबद्दल बीट अंमलदार त्यांनी त्यांच्या हद्दीतील अवैध धंद्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कैलास जाधव, पोलिस नाईक योगेश पाटोळे यांना निलंबित केले. तर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांची तातडीने जिल्हा नियंत्रण कक्षात बदली केली.

येवला स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार शांताराम घुगे, रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड आणि भाऊसाहेब टिळे आणि विशाल आव्हाड अशा चौघांना येवला येथून नाशिकला जिल्हा ग्रामीण मुख्यालयात पाठविण्बयात आले. श्री. पाटील यांनी पदभार घेताच अवैध धंद्याबाबत त्या-त्या पोलिस ठाण्याचा प्रभारी अधिकारी जबाबदार धरला जाईल, असे स्पष्ट केले होते. तसेच जिल्ह्यातील शेतकरी थेट मोबाईलवर संपर्क साधू शकतील, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या आठवड्यात पोलिस अधीक्षकांनी दणका दिला.
...
 

https://scontent.fpnq1-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख