दिवे आगारमधील गणेश मूर्ती चोरणारा आठ वर्षांनी अटक ! - Yeola police arrested Murderer from Vaijapur | Politics Marathi News - Sarkarnama

दिवे आगारमधील गणेश मूर्ती चोरणारा आठ वर्षांनी अटक !

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

येवला पोलिस ठाण्याच्या अधिका-यांना खबरीने एक टीप दिली. तशी ती नेहेमीसारखीच होती. मात्र पोलिसांनी ते गांभिर्याने घेतले. सापळा रचून संशयीताला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतल्यावर मिळालेल्या माहितीने पोलिसांना तोंडात बोट घालण्याची वेळ आली. संशयीताने आठ वर्षापूर्वी दोन सुरक्षा रक्षकांचा खून करून दूर्मीळ गणेश मूर्तीची चोरी केली होती.

नाशिक : येवला पोलिस ठाण्याच्या अधिका-यांना खबरीने एक टीप दिली. तशी ती नेहेमीसारखीच होती. मात्र पोलिसांनी ते गांभिर्याने घेतले. सापळा रचून संशयीताला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतल्यावर मिळालेल्या माहितीने पोलिसांना तोंडात बोट घालण्याची वेळ आली. संशयीत होता आठ वर्षापूर्वी दोन सुरक्षा रक्षकांचा खून करून दूर्मीळ गणेश मूर्तीची चोरी करणारा फरारी आरोपी. या कारवाईने पोलिसांचे कौतुक होत आहे.

याबाबत माहिती अशी, की येवला तालुका पोलीसांकडे १९ अॅाक्टोबरला घरफोडी व चोरीचा  प्रकार झाला होता.  त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या तपासासाठी अधिकारी काम करत होते. गुन्हा उघडकिस येण्यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मनमाडचे उपविभागीय अधिकारी समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक राजपूत यांनी पथके तयार करून पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या गुन्हेगारांच्या  हालचालींबाबत गोपनीय माहिती संकलीत करण्याचे काम सुरु केले. या तपासणीत त्यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार येवला -वैजापूर सीमेवरील बिल्वानी गाव (ता वैजापूर, जिल्हा औरंगाबाद) येथे संशयित वावरत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेतले. त्याच्या घरातून कटावणी, टॉमी, पक्कड, स्क्रू ड्राइवर, तीन टॉर्च लाइट, एक चॉपर, एक चाकू असे घरफोडीचे साहित्य आढळले. ते जप्त करण्यात आले. 

संशयिताकडे अधिक चौकशी केली. तेव्हा  शिवा जनार्धन काळे याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याला अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी दिली होतीय त्याच्या तपासात २०१२ मध्ये दिवे आगार येथील गणेश मंदिरात दरोडा टाकून दोन सुरक्षा रक्षकांचा खून करून गणेश मूर्ती चोरल्याचे प्रकरण उघडकीस आले. हे प्रकरण राज्यभर चर्चेत होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी  सतीश उर्फ सत्या जैनू काळे याला मोक्का न्यायालयाकडून जन्मठेपी ची शिक्षा झाली होती. २०१८ मध्ये सुनावणीसाठी कोर्टात आणले असता, तो रेल्वेने नागपूर येथे घेऊन जात असताना तो भुसावळ रेल्वे स्टेशन येथून पळून गेला होता. तेव्हापासून तो फरार होता. हा गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हाती लागला. 

पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीने सुरवातीला त्याचे नाव शिवा जनार्दन काळे असे सांगीतले होते. त्याबाबत अधिक माहिती घेतली असता तो दिवे आगार गणपती मंदीर दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी सतीश उर्फ सत्या जैनु काळे असल्याचे आढळले. २०१८ मध्ये पोलीसांच्या ताब्यातुन पळुन गेल्यानंतर नाव बदलुन राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या विरोधात यापूर्वी घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, खुनासहित दरोडा असे अनेक गुन्हे दाकल आहेत. अनेक जिल्हयांमध्ये त्याचा शोध सुरू होता. येवला तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भिसे, श्री राजपूत, हवालदार सानप, मोरे यांच्या पथकाने त्याला अटक करून प्रशंसनीय कामगीरी केली.
...
 

https://scontent.fnag4-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख