राज्यमंत्री बच्चू कडू येवल्याला हक्काचे पाणी देणार का? - Yeola Farmers meet Bacchu Kadu for irrigation water | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यमंत्री बच्चू कडू येवल्याला हक्काचे पाणी देणार का?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

अनेक वर्षे टंचाई अन् दुष्काळी तालुका अशी प्रतिमा असलेल्या येवला तालुक्याला `येवल्याला हक्काचे पाणी मिळावे` या मागणीलाठी प्रहार संघटनेचे पदाधिकारी, नेत्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना साकंडे घातले आहे. त्यामुळे आचा बच्चू कडू येवल्याला पाणी देणार का? याची उत्सुकता आहे. 

नाशिक : अनेक वर्षे टंचाई अन् दुष्काळी तालुका अशी प्रतिमा असलेल्या येवला तालुक्याला `येवल्याला हक्काचे पाणी मिळावे` या मागणीलाठी प्रहार संघटनेचे पदाधिकारी, नेत्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना साकंडे घातले आहे. त्यामुळे आचा बच्चू कडू येवल्याला पाणी देणार का? याची उत्सुकता आहे. 

येवल्याचे नेतृत्व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नेतृत्व लाभल्यावर ही प्रतिमा बदलेल अशी आशा नागरिकांत आहे. त्यात काही प्रमाणात यश देखील आले. वळण बंधारे योजनेद्वारे येवल्याला मांजरपाड्याचे पूरपाणी देखील मिळाले होते. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेच्या मागणी पाहिले जात आहे.   

तालुक्यातील अनेक भागात पालखेड डाव्या कालव्याचे शेतीसाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे पिकांना मोठी अडचण होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २००४ मध्ये निश्चित केलेल्या वाटपानुसार शेतीला पाण्याचा कोटा मंजुर करावा. तालुक्यासाठी पालखेड डाव्या कालव्याचे शेतीसाठी हक्काचे पाणी द्या अशी मागणी येवला तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे. सिंचनाच्या पाण्यासाठी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथे श्री. कडू यांची भेट घेतली. यावेळी पाण्यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल फरताळे, किरण चरमळ, वसंतराव झांबरे, शंकर गायके, गणेश लोहकरे, ज्ञानेश्वर जगझाप, सचिन पवार, जगदीश गायकवाड, सागर गायकवाड, गोरख निर्मळ, संजय खांदे, अंकुश कदम आदी उपस्थित होते.

येवला तालुका सतत दुष्काळी असल्याने सिंचनासाठी उपलब्ध पाणी साठ्यातून  ५२ टक्के साठा येवला तालुक्यासाठी आरक्षित आहे. प्रत्यक्षात लाभक्षेत्राच्या २० टक्केच पाणी सिंचनासाठी उपलब्ध होते. तालुक्याच्या हक्काचे पाणी नेमकं मुरते कुठे? असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. राज्यभर बाष्पीभवन व वहनव्यय सुमारे १५ टक्के आहे. केवळ याच कालव्याचा वहनव्यय ८० टक्क्यांपर्यंत दाखविला जातो. मात्र कोणीही उघडपणे यावर बोलत नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. यावर श्री. कडू यांनी लवकरच मंत्रालयात बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या.

जलसंपदा विभागाची एरंडगाव येथील पडीत जागा व्यावसायिकांना गाळे बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, महात्मा फुले कर्जमाफी योजनेत तांत्रिक त्रुटी अभावी वंचित राहिलेल्या तीनशे शेतकऱ्यांची यादी शिष्टमंडळाने राज्यमंत्री कडू यांचेकडे सादर केली. यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन राज्यमंत्री कडू यांनी दिली. 
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख