आमचा नारा, नाशिकला "राष्ट्रवादी महिला काँगेस घरोघरी"

राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसतर्फे नाशिक जिल्ह्यात पक्षाच्या कामकाजाची व पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सामाजिक, महिला, शेतकरी यांस्दर्भात केलेल्या कामकाजाची माहिती घरोघरी पोहोचविण्याची मोहिम राबविली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावात महिला शाखा स्थापन केली जाईल, अशी माहिती जिल्हा अध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी दिली.
NCP Balkawade
NCP Balkawade

नाशिक : राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसतर्फे नाशिक जिल्ह्यात पक्षाच्या कामकाजाची व पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar`s contribution) यांच्या सामाजिक, महिला, शेतकरी यांस्दर्भात केलेल्या कामकाजाची माहिती घरोघरी पोहोचविण्याची मोहिम राबविली जाणार आहे. (Prapoganda drive to NCP policy and contribution house house) त्यासाठी प्रत्येक गावात महिला शाखा स्थापन केली जाईल, अशी माहिती जिल्हा अध्यक्षा प्रेरणा बलकवडे (Prerana Balkawde) यांनी दिली. 

जिल्हा  राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापदिनानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे कार्य आणि विचार तळागाळात पोहवण्यासाठी यापुढे महिलांनी सक्रीयपणे काम करण्याची गरज आहे. शरद पवार यांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना ५०% आरक्षण मिळाले. हा सर्व महिलांचा राजकीय सन्मान आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात "खेडो-पाडी गावो-गावी, राष्ट्रवादी महिला काँगेस घरोघरी" हा उपक्रम राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राबविण्यात येणार आहे. 

त्याची सुरवात नुकतीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली झाली. नाशिक जिल्ह्यातील १५ तालुके, नगरपालिका  शहर  व देवळाली कॅन्टोनमेंट बॅार्ड येथे शाखा स्थापन करुन गावोगावी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 

या अनुषंगाने भगूर (ता. नाशिक) येथे महिला शाखेचे व नामफलकाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष बलकवडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भगूर शहराची नविन कार्यकरणी जाहिर करण्यात आली. यामध्ये भगूर शहराध्यक्ष पदी प्रेमलता भुषण राजगुरु, उपाध्यक्ष सिद्धी राहूल पाटलरे, रोहिणी गणेश देशमुख, सरचिटणीस निलम अमोल मोजाड, चिटणीस सुजाता निलेश गोरे, सचिव संघटक विद्या दिलीप बसवे व संगिता गणेश लकारिया यांचासमावेष आहे. 

कार्यकारीणी सदस्य पदी कविता गोरे, रुपाली गवारे, मोनाली इंदरखे, राधिका मोजाड, वैशाली राजगुरु, वर्षा पंडोरे, संगिता झांजरे, रुबिना खान, मंदाकिनी कदम, किरन जाधव, छाया डावरे, वंदना पवार यांची निवड जाहिर झाली. या कार्यक्रमास सर्वं महिला पदाधिकारी, शाखेच्या नविन महिला सदस्या उपस्थित होत्या.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com