महिला अत्याचार प्रतिबंधासाठी अधिक कडक कायदा करणार! - Womens Harrasment act will more make effective | Politics Marathi News - Sarkarnama

महिला अत्याचार प्रतिबंधासाठी अधिक कडक कायदा करणार!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

महिलावरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकतार विविध प्रयत्न करीत आहे. यासंदर्भात गुन्हेगारांना कायद्याचा धाक निर्माण होऊन त्यांना जलद व कडक शिक्षा व्हावी यासाठी कायदा अधिक प्रभावी व कडक करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

नंदुरबार : महिलावरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकतार विविध प्रयत्न करीत आहे. यासंदर्भात गुन्हेगारांना कायद्याचा धाक निर्माण होऊन त्यांना जलद व कडक शिक्षा व्हावी यासाठी कायदा अधिक प्रभावी व कडक करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. 

गृहमंत्री देशमुख यांनी शुक्रवारी नंदुरबार जिल्ह्याच्या दौरा केला. यावेळी त्यांनी शहादा येथे कोरोना आणि कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील सारंगखेडा येथील महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत त्यांनी माहिती घेतली. ते म्हणाले, या घटनेशी संबधित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविले जावे, यासाठी सुचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठीची आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. तज्ज्ञ वकीलाची नेमणूक करण्यात येईल.

श्री. देशमुख म्हणाले महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दुर्दैवी आहेत. अशा प्रकरणात गुन्हेगाराना कडक शिक्षा व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सारंगखेडा येथील प्रकरणात ॲड. उज्जवल निकम यांच्यासारख्या तज्ज्ञ वकीलाचे सहकार्य घेण्यात येईल. त्यासाठी पोलीसांनी आवश्यक प्रस्ताव सादर करावा. नंदुरबार हा सीमावर्ती जिल्हा असल्याने पोलिसांवर अधिक जबाबदारी आहे. नवापूर आणि शहादा पोलिस ठाण्याचा प्रश्न लवकरमार्गी लावण्यात येईल. नंदुरबार पोलीसांकडून सुरु असलेला ‘एक आरोपी, एक पोलीस ’ हा उपक्रम स्तुत्य आहे. तो उपक्रम राज्यात सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

यावेळी आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, खासदार डॉ. हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
....

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख