खाजगी रुग्णालये कोरोनासाठी ताब्यात घेण्याची शक्यता?

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने केलेल्या नियोजनानुसार जुलैअखेर शहरात दहा हजारांचा तर जिल्ह्यात एकूण चाळीस हजार रुग्णसंख्येचा टप्पा गाठण्याकडे सध्या वाटचाल सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने खाटांची संख्यादेखील वाढणार आहे.
खाजगी रुग्णालये कोरोनासाठी ताब्यात घेण्याची शक्यता?

नाशिक : जिल्ह्यातील पंधरा हजार २८१ कोरोना बाधीतांना आतापर्यंत यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत चार हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरात वीस हजार आणि जिल्ह्यात एकूण चाळीस हजार रुग्णसंख्येचा टप्पा गाठण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी सांगितले, की जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७२.४६,  टक्के, नाशिक शहरात ७४.९९ टक्के, मालेगाव मध्ये  ७५.५७  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.०६  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७४.५०  इतके आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ६२०  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने केलेल्या नियोजनानुसार जुलैअखेर शहरात दहा हजारांचा तर जिल्ह्यात एकूण चाळीस हजार रुग्णसंख्येचा टप्पा गाठण्याकडे सध्या वाटचाल सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने खाटांची संख्यादेखील वाढणार आहे. सद्यःस्थितीत शहरात पाच हजार ६०० खाटांचे नियोजन आहे. त्याचा एक भाग म्हणून खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. 

आजमितीस शहरामध्ये कोरोनाचे तेरा हजार ८०५ रुग्ण आहेत. तर रुग्णांवर उपचार करण्यासाठी पाच हजार ६०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाच्या अंदाजानुसार ऑगस्टअखेर शहरातील रुग्णसंख्या वीस हजारांपर्यंत पोचेल. त्यामुळे अतिरिक्त खाटांची आवश्‍यकता पडेल. त्यातही शहरात १३ हजार रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दहा हजार ३५२ असल्याने पालिकेला दिलासा मिळाला आहे. 
कोरोनाची परिस्थिती अधिक बिकट झाल्यास शहरातील वोक्हार्ट, अपोलो, अशोका व सह्याद्री ही चार खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याची तयारी प्रशासनाची आहे. तसेच, आडगाव येथील रुग्णालयात एक हजार खाटांची व्यवस्था करता येईल. समाजकल्याण विभागाचे वसतिगृह ताब्यात घेण्याचीही तयारी प्रशासनाने केली आहे. सध्या ठक्कर डोम येथे ३५० खाटांचे कोविड सेंटर सुरू झाले आहे.  मुक्तिधाम येथे ३०० खाटांचे सेंटर उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. चार खासगी हॉस्पिटल मिळून एकूण दोन हजार १५० खाटांची नव्याने तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. 
---

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=oEJfDyarqkIAX-7626e&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=3a1d891f4eb11eec9bda32c8a212f221&oe=5F5887A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com