बंद उद्योगांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलणार 

बंद उद्योग सुरु करण्यासंदर्भातील धोरणात्मक निर्णय, सेझ डीनोटीफिकेशन, औद्योगिक वसाहतीचे रस्ते, पाणी व वीज प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावले जातील.
Kokate- Pawar
Kokate- Pawar

सिन्नर : बंद उद्योग सुरु करण्यासंदर्भातील धोरणात्मक निर्णय, (Policy matter regarding non working Industries) सेझ (SEZ)डीनोटीफिकेशन, (Denotification) औद्योगिक वसाहतीचे रस्ते, पाणी व वीज प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajitdada Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात संबंधित विभागाच्या मंत्री, अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी दिली. 

सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीमध्ये मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपिठावर प्रशासक मंडळाच्या अध्यक्षा सुधा माळोदे, उपाध्यक्ष नारायण पाटील, सदस्य संजय शिंदे, पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, पंडित लोंढे, अविनाश तांबे, संचालक सुनील कुंदे, मिनाक्षी दळवी, प्रभाकर बडगुजर, व्यवस्थापक कमलाकर पोटे, वीजवितरणचे कार्यकारी अभियंता डोंगरे, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, मुसळगावचे उपसरपंच अनिल सिरसाट आदी उपस्थित होते. 

वसाहत नावारूपाला यावी 
नाशिक-पुणे, नाशिक-शिर्डी या चौपदरी रस्त्यांबरोबरच समृध्दी महामार्ग, प्रस्तावित सुरत-चेन्नई ग्रिनफिल्ड महामार्ग, नाशिक-पुणे रेल्वेचे सिन्नर जवळ दोन किमी लांबीचे होत असलेले स्टेशन, त्याचप्रमाणे ओझर व शिर्डी विमानतळांना जोडणारा रस्ता चौपदरी करण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेली मागणी या सर्वांमुळे उद्योगनगरीला पोषक वातावरण तयार होणार आहे. त्याचा फायदा घेत नानांनी उभी केलेली वसाहत आशिया खंडात नावारुपाला येईल याकडे लक्ष द्यावे असे आवाहनही कोकाटे यांनी केले. 

वाढीव पाणीमागणी संदर्भातील एकरकमी भरावयाच्या ३ कोटी १९ लाख रुपये रक्कमेचे १० हप्ते करुन मिळावे, रस्ते दुरुस्ती, बंद उद्योग सुरु करण्यासंदर्भातील अटी शिथिल कराव्यात, औद्योगिक वसाहतीचा डी-प्लस झोनमध्ये समावेश व्हावा आदी मागण्या प्रशासक मंडळाच्या अध्यक्षा सुधा माळोदे यांनी केल्या. 

क्रीडासंकुलात उद्योजकांसाठी क्लबसह सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच महिला उद्योजिका, बचत गटांसाठी पॅकींग व विक्रीसाठी क्लस्टर उभारण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. विलास मोगल, प्रवीण देशमुख, आण्णा पाटील, कैलास वाकचौरे, सुनील जोंधळे, शिवाजी आवारे,अरुण डावखर, अनिल असावा, सुभाष बडगुजर, शिवाजी चासकर, रवी मोगल, अभिषेक गडाख, तुषार गडाख आदींसह उद्योजक हजर होते. अविनाश तांबे यांनी प्रास्ताविक केले. 

गडाख नानांचे स्मारक व्हावे
माजी आमदार स्व.नानासाहेब गडाख यांनी कठीण परिस्थितीत उद्योगनगरी उभी केली. नानांनी उभ्या केलेल्या या संस्थेत त्यांचे चांगले स्मारक व्हावे यासाठी औद्योगिक वसाहतीच्या फंडातून त्याची तरतुद करावी, उद्योजकांकडून कुठलाही पैसा घेऊ नये अशी सूचना करतानाच उद्योजकांनी स्वयंस्फूर्तीने देणगी दिल्यास स्वीकारावी अशी सूचना आमदार कोकाटे यांनी केली. 
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com