नाशिकसाठी 50 इलेक्ट्रीक बसेससाठी केंद्राकडे पाठपुरावा करेन - Will take followup for 50 electric buses praposal ;Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

नाशिकसाठी 50 इलेक्ट्रीक बसेससाठी केंद्राकडे पाठपुरावा करेन

संपत देवगिरे
गुरुवार, 8 जुलै 2021

शहरात सुरु झालेल्या बससेवा आधुनिक व नागरिकांनी अवलंबून रहावे अशी आहे. त्यामुळे खाजगी वाहनांची संख्या कमी होऊन नाशिकचा शाश्वत विकास होईल. केंद्राकडे प्रलंबीत असलेल्या 50 इलेक्ट्रीक बसेसचा प्रस्ताव मंजूरीसाठी व्यक्तीशः प्रयत्न करेन, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नाशिक : शहरात सुरु झालेली बससेवा आधुनिक व नागरिकांनी अवलंबून रहावे अशी आहे. त्यामुळे खाजगी वाहनांची संख्या कमी होऊन नाशिकचा शाश्वत विकास होईल. यासंदर्भात केंद्राकडे प्रलंबीत असलेल्या 50 इलेक्ट्रीक बसेसचा प्रस्ताव मंजूरीसाठी व्यक्तीशः प्रयत्न करेन, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले..  

शहराची `सिटी लींक कनेक्टींग नाशिक` या बससेवेचे उद्घाटन आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते. 

ते म्हणाले, आधुनिक शहरांमध्ये परिवहन सेवा आवश्यक असते. कचऱ्याची शाश्त्रीय वल्हेवाट लागणे महत्वाचे आहे. आज आपण शहरांकडे पाहतो, तेव्हा ते शहर किती चांगले आहे याचा विचार करीत होतो. अलिकडच्या काळात ते शहर किती सस्टेनेबल आहे. तेथील नदी-नाले किती प्रदुषित आहेत याचा विचार केला जातो. नदी, नाले प्रदुषणात औद्योगिक प्रदुषण केवळ दहा टक्के आहे. नव्वद टक्के प्रदुषण हे शहरांमुळे होते. शहरांचे सांडपाणी प्रक्रीया न होता ते जेव्हा जलस्त्रोतांत जाते तेव्हा हे प्रदूषण होते. 

ते म्हणाले, यासंदर्भात मागच्या काही दिवसांत याबाबत आपण पुढाकार घेतला. शहरांतील सर्व सांडपाणी प्रक्रिया करूनच सोडले जावे, अशा सुचना दिल्या. असे अनेक उपक्रम सुरु केले. नाशिक महापालिकेने देखील त्यात विविध उपक्रम हाती घेतले. त्याचा चांगला परिणाम दिसून आले. 

श्री. फडणवीस म्हणाले, देशात सर्वाधिक नागरीकरण झालेल्या राज्यांत महाराष्ट्र तिसरे आहे. त्यामुळे छोट्यातल्या छोट्या शहरांत देखील कचऱ्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट होईल यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी निधी उपलब्ध केला. त्याचा परिणाम असा आहे की, देशात कचऱ्यावर प्रक्रीया करणाऱ्या स्रवाधिक नगरपालिका आपल्या महाराष्ट्रात आहेत. मोठ्या प्रमाणात आणि छोट्या नगरपालिकांनी देखील पुढाकार घेतला. मात्र शहरांतील प्रदुषणात खाजगी वाहने जबाबदार आहेत. शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात दुचाकी व चार चाकी वाहने वाढत आहेत. जगामध्ये उत्तम शहरी व्यवस्थेचा भाग म्हणजे त्या शहरात एक उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे हे महत्त्वाचे मानले गेले आहे. कारण त्याने खाजगी वाहने कमी होतात. पूर्वी आपण परिवहन सेवेचा विचार करताना आर्थिक विचार करत होतो. 

श्री. फडणवीस पुढे म्हणाले, पर्यावरण ऱ्हासामुळे जे नुकसान होते त्याचा आर्थिक स्वरुपात विचार केल्यावर त्यातील गांभिर्याची जाणीव झाली. त्यामुळे एक शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असली पाहिजे. आज जी परिवहन सेवा सुरु केली. ती सेवा नागरिक त्यावर अवलंबून राहतील अशी आहे. त्यामुळे त्याचा शहराला नक्की उपयोग होईल.  

नाशिकची मेट्रो ठरतेय मॅाडेल
ते म्हणाले, नाशिकसाठी मंजूर केलेली निओ मेट्रो ही एक आदर्श मेट्रो ठरतेय. त्याला एक मॅाडेल म्हणून केंद्र सरकारने स्विकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे सादरीकरण वाराणसी शहरासाठी केले आहे. त्यामुळे नाशिकची निओ देशासाठी एक आदर्श मेट्रो सेवा ठरेल असे विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. 

यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ऑनलाईन उपस्थित होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विशेष संदेश पाठवला. महापौर सतीष कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागूल, माजी मंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल, स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश गिते, महापालिकचे आयुक्त कैलास जाधव, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहूल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे, दिक्षा लोंढे उपस्थित होते.
...
हेही वाचा...

भारती पवारांचे मंत्रीपद...सांगितले बंगलूरला अन् गेल्या दिल्लीला !

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख