राज ठाकरेंच्या दौऱ्याने मुकी `मनसे` बोलेल का?

यापूर्वी मागील पाच वर्षे `मनसे`ची महापालिकेत सत्ता होती. राज ठाकरेंच्या संकल्पनेतील विविध कामे डोळ्यांना दिसतात. ती कामे लोकांशी बोलतात. पण हा पक्ष, त्याचे वरीष्ठ नेते सध्या कोमात गेल्यासारखे दिसतात. अगदी त्यांच्यावर टिका केली तरीही...त्यामुळे येत्या आठवड्यात दौऱ्यावर येणारे राज ठाकरे `मनसे`ला बोलतं तरी करतील का? अशी चर्चा आहे.
Raj Thakre
Raj Thakre

नाशिक : यापूर्वी मागील पाच वर्षे `मनसे`ची महापालिकेत सत्ता होती. (MNS was in power in NMC last five year) राज ठाकरेंच्या संकल्पनेतील विविध कामे डोळ्यांना दिसतात. ती कामे लोकांशी बोलतात. (Thakre`s devolopment projct are speaks it`s stoty themeself) पण हा पक्ष, त्याचे वरीष्ठ नेते सध्या कोमात गेल्यासारखे दिसतात. अगदी त्यांच्यावर टिका केली तरीही...त्यामुळे येत्या आठवड्यात दौऱ्यावर येणारे राज ठाकरे (Raj Thakre)  `मनसे`ला बोलतं तरी करतील का? अशी चर्चा आहे. 

`मनसे`प्रमुख ठाकरे येत्या 16 ते 18 असे तीन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा संघटनात्मक कामकाजासाठी असल्याचे बोलले जाते. मात्र, तसे नक्की होईल की नाही, याची शाश्वती नाही. त्यांचा दौरा असल्याने त्याचा राजकारणाशी संबंध जोडला जाईलच. त्यानिमित्ताने महापालिका निवडणुकीची चर्चा होईलच. मात्र गेले काही दिवस या पक्षाची स्थिती पाहता, त्याची केवळ चर्चाच होईल असे वाटते. प्रत्यक्षात काही होईल की नाही, हे सांगता येत नाही. 

त्याला कारणेही तशीच आहेत. या पक्षातील सर्वच राज ठाकरे यांच्यावर मनापासून प्रेम करणारे आहेत, हे वादातीत आहे. मात्र त्यांची विभागणी तीन गटांत होते. पहिल्या प्रकारात जाणकार ज्येष्ठ मंडळी आहेत. ती शांतपणे परिस्थितीवर नजर ठेऊन आहेत. दुसरी मनापासून पक्षासाठी झटणारी मात्र प्रतिसाद मिळत नसल्याची खंत असलेला वर्ग. तर उर्वरीत मोजकी मंडळ फक्त सोशल मीडियावर चमकोगिरी करणारी. त्यांचे सगळेच काम फक्त फेसबुक व व्हाटस्अॅपवर असते. त्यात देखील ते इतर कोणाचेही दर्शन घडणार नाही याची काळजी घेतात. यांना निवडणूक डोळ्यापुढे ठेऊऩ कामाची दिशा देणारा दौरा ठरेल का? हे महत्त्वाचे आहे. 

राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापूर्वी पाच वर्षे महापालिकेत सत्तेत होती. त्या कामकाजाच्या पद्धतीवर टिका करणारी मंडळी देखील होतीच. राजकारण असल्याने त्यात वावगे काही नाही. मात्र राज ठाकरे यांच्याकडे असलेला शहर विकासाचा एक वेगळा दृष्टीकोण दिसून आला. महापालिकेचा निधी खर्च न करता उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीतून त्यांनी विविध प्रकल्प राबविले. त्यात शहराला पूर्व- पश्चिम अशी विभागणी करणाऱ्या उड्डानपूलाच्या खांबावर शहराच्या विकासात, वाटचालीत योगदान असलेल्यांची छायाचित्र रंगविणे, पुलाखाली अतिक्रमण होऊ नये यासाठी लार्सन अॅंड टुब्रो कंपनीच्या सहकार्याने दुभाजकात उद्यान व रोषणाई. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, गोदावरी नदीवर अहिल्याबाई होळकर पूलानजीक रोषणाई असलेला कारंजा, सावरकर नगर येथील पुलाजवळ गोदापात्राचे सुशोभिकरण असे विविध प्रकल्प आहेत. 

श्री. ठाकरे यांच्या प्रयत्नातून उद्योगपती रतन टाटा यांच्या सहकार्याने पंडीत नेहरू वन उद्यानात लेसर पार्क व नाशिकचा इतिहास सांगणारी वृक्षराजी असे विविध प्रकल्प होते. त्यात राज ठाकरे यांनी अगदी नाशिकच्या झाडांनाही बोलके केले होते. मात्र भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. त्यात हे सर्व दुरदृष्टीचे प्रकल्प बंद पडले किंवा बाजूला पडले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकला आले असता, त्यांनी राज ठाकरे यांनी रतन टाटा यांना निमंत्रीत करून हे प्रकल्प केले. राज ठाकरे नसते तरीही टाटा येऊन ते प्रकल्प सुरु करू शकले असते असे विधान केले.

खरे तर ही थेट चांगल्या कामावर, पक्षाच्या प्रमुखावर टिका होती. त्याला `मनसे`कडून प्रत्युत्तर अपेक्षीत होते, मात्र तसे काहीच झाले नाही. मनसे बाजुला पडण्याचे कारण हेच आहे. या पक्षाच्या नेत्यांना विरोधात असूनही सूरच गवसलेला नाही. झाडांनाही बोलके करणाऱे राज ठाकरे आपल्या दौऱ्यात किमान पक्षाच्या नेत्यांना बोलके करून गेले तरी त्यांचा दौरा आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने शहरात राजकीय तरंग उमटविण्यात यशस्वी होईल.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com