भाजपतील एकनाथ खडसेंची जागा रक्षा खडसे घेतील? - Will MP Raksha khadse take the place of Eknath Khadse in BJP?, BJP Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

भाजपतील एकनाथ खडसेंची जागा रक्षा खडसे घेतील?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 जून 2021

भारतीय जनता पक्षात असताना एकनाथ खडसे `ओबीसी` नेते आंदोलनात सहभागी होत होते. त्यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्या सून रक्षा खडसे या भाजपतर्फे `ओबीसी` आरक्षणासाठी मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे एकनाथ खडसेंनी पक्ष सोडल्याने निर्माण झालेली `ओबीसी` त्या पक्षातील नेतृत्वाची पोकळी रक्षा खडसे भरून काढतील का? अशी चर्चा आहे. 

जळगाव : भारतीय जनता पक्षात असताना एकनाथ खडसे `ओबीसी` नेते आंदोलनात सहभागी होत होते. (while in BJP Eknath Khadse use to involve in OBC agitations) त्यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्या सून रक्षा खडसे या भाजपतर्फे `ओबीसी` आरक्षणासाठी मैदानात उतरल्या आहेत. (Now Eknath Khadse`s Daughter in law is active) त्यामुळे एकनाथ खडसेंनी पक्ष सोडल्याने निर्माण झालेली `ओबीसी` त्या पक्षातील नेतृत्वाची पोकळी रक्षा खडसे (M. P. Raksha Khadse) भरून काढतील का? अशी चर्चा आहे. 

भारतीय जनता पक्षातर्फे गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांनी खांद्याला खांदा लावून `ओबीसी` समाज घटकांना त्यांचे हक्क मिळवून  देण्यासाठी सहभाग घेतला. गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले, त्यानंतर खडसे यांनी पक्षाच्या माध्यमातून `ओबीसी` लढा सुरू ठेवला.

राज्यात `ओबीसी` नेते म्हणून ओळखले जातात. मात्र पक्षात अंतर्गत राजकीय स्पर्धेत वरिष्ठ नेत्यांनी त्यांची कोंडी केली. स्रवात ज्येष्ठ असतानाही त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. हा राजकीय वाद झाल्याने ते पक्षाबाहेर पडले. त्यामुळे पक्षातील `ओबीसी` नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. 

भारतीय जनता पक्षातर्फे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी येत्या २६ जूनला राज्यात चक्का जाम आंदोलन होणार आहे. पंकजा मुंडे या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. रक्षा खडसे यांचाही त्यात सहभाग आहे.

मुंबई येथे या आंदोलनाबाबत बैठक झाली यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे, चंदशेखर बावनकुळे, यांच्या समवेत खासदार रक्षा खडसे उपस्थित होत्या. पक्षातील `ओबीसी` नेतृत्वाची एकनाथ खडसे यांची जागा भरून काढण्यासाठी पक्षाची त्यांची सून रक्षा खडसे यांच्यावर मदार आहे. आगामी काळात खासदार रक्षा  खडसे हे आव्हान कसे पेलणार?, त्याचा  पक्षाला किती फायदा होणार? याची चर्चा आहे.
...
हेही वाचा...

भुजबळ म्हणतात, `ओबीसी` विरुद्ध मराठा वादात `मी टार्गेट`

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख