निफाड, रानवड बाबत अजित पवारांच्या आश्वसानाचे काय होणार?  - Will Ajit Pawar keep his word to starts NIHAD Sugar Factory | Politics Marathi News - Sarkarnama

निफाड, रानवड बाबत अजित पवारांच्या आश्वसानाचे काय होणार? 

संपत देवगिरे
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

सलग आठ वर्षे बंद असलेला निफाड आणि तीन वर्षांपासून बंद असलेल्या रानवड साखर कारखाने सुरु करण्यासाठी सगळ्यांनीच शासनाकडे प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात तोंडभरुन आश्वासन दिले. मात्र दिवाळीनंतरही तशा हालचाली नसल्याने शब्दाला पक्के उपमुख्यमंत्री पवार यांचा शब्द देखील हवेतच विरतो की काय? अशी स्थिती आहे. 
 

नाशिक : सलग आठ वर्षे बंद असलेला निफाड आणि तीन वर्षांपासून बंद असलेल्या रानवड साखर कारखाने सुरु करण्यासाठी सगळ्यांनीच शासनाकडे प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात तोंडभरुन आश्वासन दिले. मात्र दिवाळीनंतरही तशा हालचाली नसल्याने शब्दाला पक्के उपमुख्यमंत्री पवार यांचा शब्द देखील हवेतच विरतो की काय? अशी स्थिती आहे. 

निफाड साखर कारखान्यावर जिल्हा बॅंक, अन्य संस्था, कामगारांची देणी असा २९५ कोटींचा बोजा आहे. या कारखान्यावर सध्या सरफेसी कायदा २००२ अंतर्गत कारवाई सुरु आहे. रानवड कारखाना राज्य शासनाने सहकार कायद्यान्वये २००५ मध्ये अवसायानात काढला होता. त्यानंतर तो ६ वर्षे वैद्यनाथ कारखाना, संभाजीराजे साखर उद्योगाने सहा वर्षे भाडेपट्ट्यावर घेतला. मात्र शेवटचे दोन हंगाम त्यांनीही बंद ठेवले. हे कारखाने भाडेपुट्ट्यावर चालविण्यास देण्याचा अंतिम अधिकार जिल्हा बॅंकेला आहे. त्यात राज्य सरकार देखील हस्तक्षेप करु शकनार नाही, असे तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले होते. 

या सर्व परिस्थितीला विधानसभा निवडणूकीत राजकीय ट्विस्ट मिळाला. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे दिलीप बनकर यांना मतदान करा, मी दोन्ही साखर कारखाने सुरु करतो, असे सांगितले होते. त्या निवडणूकीत श्री. बनकर निवडून आले. आता कारखाने सुरु होतील अशी आशा ऊसउत्पादकांना वाटू लागली होती. आमदार दिलीप बनकर यांनी देखील कारखाने सुरु होणार, अशी ग्वाही देत मंत्रालयाच्या खेट्या घातल्या. गेले सहा महिने त्याबाबत सतत चर्चा घडविली जात होती. मात्र आता दिवाळी पार पडली. विविध कारखान्यांचा हंगाम सुरु झाला. साखर कारखाना हा सतत सहा महिने चालणारा प्रक्रिया उद्योग आहे. त्यामुळे बिगर हंगामी कालावधीत त्याची दुरुस्ती, देखभाल करावी लागते. त्यानंतरच कारखाना सुरु करणे शक्य होते. आता हे दोन्ही कारखाने सुरु करायचे तर किमान तीन ते चार महिने देखभाल दुरुस्तीला लागतील. विविध विभागांचे परवाने मिळवावे लागतात. तोपर्यंत गळीत हंगाम संपुष्टात येईल. त्यामुळे हे दोन्ही साखर कारखाने सुरु होणार हे मृगजळ ठरते की काय? अशी भिती व्यक्त होत आहे.    

यासंदर्भात गेले तीन महिने हे साखर कारखाने सुरु करणार, यासाठी स्थानिक आमदार दिलीप बनकर यांनी विविध बैठका घेतल्या. यासंदर्भात तालुक्यातील सर्व नेते देखील राजकीय मतभेद विसरुन एकत्र आले. त्यात किमान रानवड कारखाना प्राधान्याने सुरु करावा असे निश्चित केले. त्यासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होऊ संबंधीतांना तशा सुचना देण्यात आल्या. मात्र सध्याचा कालावधी लक्षात घेता कारखान्याचा गळीत हंमाग सुरु होने अशक्य आहे. त्यामुळे श्री. पवार यांचा शब्द अन् आश्वासन हवेतच विरणार अशी स्थिती आहे.
...
 

https://developers.facebook.com/docs/plugins/embedded-posts/?prefill_hre...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख