नाशिककरामधील नाराजीची शिवसेनेला वाटतेय भिती

पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी विकासकामे न झाल्यास मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भीती भाजप पाठोपाठ शिवसेनेलादेखील असल्याने त्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना पत्र लिहून महासभेने संमत केलेले अंदाजपत्रकाचा ठराव तातडीने देण्याची मागणी केली.
Ajay Boraste,
Ajay Boraste,

नाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी विकासकामे न झाल्यास मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, (If devolopment works not executed people may disfavour) अशी भीती भाजप पाठोपाठ शिवसेनेलादेखील असल्याने त्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते (Shivsena leader Ajay Boraste) यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना पत्र (Send Letter to Mayor Satish Kulkarni) लिहून महासभेने संमत केलेले अंदाजपत्रकाचा ठराव तातडीने देण्याची मागणी केली.

यंदा ३१ मार्चपूर्वी अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत नमुद करण्यात आलेली कामे पूर्णत्वास न्यावी लागतात. परंतु, यावर्षी मे महिन्यात अंदाजपत्रकीय सभा झाल्याने दोन महिने अंदाजपत्रक लांबणीवर पडले. त्यात आता महापौरांकडून अद्यापही नगरसचिव विभागाला ठराव प्राप्त न झाल्याने सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांमध्ये खदखद वाढली आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी सत्ताधारी भाजपला घरचा आहेर दिल्यानंतर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापौरांना पत्र लिहून खदखद व्यक्त केली. महासभेचे अंदाजपत्रक ३१ मार्चपूर्वी मंजूर होणे आवश्‍यक होते, परंतु तब्बल दोन महिन्यानंतर मंजुरी मिळाली. मंजुरी मिळून पंधरा दिवस उलटले तरी अद्यापही प्रशासनाला ठराव प्राप्त झाला नाही. त्यामुळे सदस्यांनी सुचविलेल्या कामांचा समावेश होईल की नाही, अशी भीती पत्रात व्यक्त करण्यात आली.

...तर जनतेची नाराजी
पुढील वर्षी फेब्रुवारीत महापालिकेच्या निवडणुका होत असून, नगरसेवकांना प्रभागांमध्ये जास्तीत-जास्त विकासकामे करावी लागणार आहे. महासभेच्या अंदाजपत्रकानुसार विकासकामे न झाल्यास नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. त्याचा फटका सर्वच पक्षांना बसेल. त्याअनुषंगाने अधिकाधिक विकासकामे होण्यासाठी अंदाजपत्रकाला तत्काळ मंजुरी द्यावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.

प्रशासकीय अंदाजपत्रकानुसार कामे झाल्यास महासभेने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाला अर्थ उरणार नाही. त्यामुळे महासभेतील चर्चा व निर्णय ‘बोलाची कढी व बोलाचाच’ भात होईल.
- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, महापालिका. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com