यामुळे नाशिकमध्ये पोलिस दिसले, की शेतकरी पळत सुटतात?

शेतमालाची वाहने बाजार समितीबाहेर उभी केली जातात. शहरातील पोलिस या वाहनांवर काठ्या मारतात. शेतकऱ्यांवर दडपशाही करुन दंडाची वसुली करतात. त्यामुळे सध्या पोलिस दिसले, की शेतकरी पळत सुटतात.
यामुळे नाशिकमध्ये पोलिस दिसले, की शेतकरी पळत सुटतात?

नाशिक : सध्या कोरोना संसर्गामुळे बाजार समितीत शेतमालाचे लिलाव करतांना सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते. त्यामुळे शेतमालाची वाहने बाजार समितीबाहेर उभी केली जातात. शहरातील पोलिस या वाहनांवर काठ्या मारतात. शेतकऱ्यांवर दडपशाही करुन दंडाची वसुली करतात. त्यामुळे सध्या पोलिस दिसले, की शेतकरी पळत सुटतात. हे प्रकार थांबले नाहीत, तर शहरात रास्ता रोको करण्याचा इशारा भाजपचे नेते, कादवा साखर कारखान्याचे संचालक सुनील केदार यांनी दिला आहे. 

बाजार समितीत सध्या कॉंग्रेसचे नेते संपत सकाळे सभापती आहेत. संचालक मंडळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर भाजपकडून आंदोलनाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्य प्रश्‍नावर सत्ताधारी कॉंग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष असे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. त्यात पोलिसांना कोण आवरणार? हा नवा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

ही बाजार समिती राज्यातील नावजलेली समिती आहे. त्यामुळे जिल्ह्यासह लगतच्या नगर जिल्ह्यातील शेतकरीही येथे भाजीपाला विक्रीसाठी येतात. सध्या ही बाजार समिती कोरोनाग्रस्त झाली आहे. बाजार समितीच्या परिसरातील वस्तींत शेकडो कोरोनाबाधीत राहतात. त्यामुळे हा परिसर सील करण्यात आला आहे. बाजार समितीत देखील विविध दक्षता घेतली जाते. त्यात शेतकऱ्यांची वाहने बाजार समितीच्या आवारात न आणता मालाचा प्रतिनिधीक एक क्रेट लिलावासाठी नेला जातो. त्यामुळे सर्व वाहने बाजार समितीच्या रस्त्यालगत उभी केली जातात. शेतकरी आपला शेतमाल पेठ रोड व दिंडोरी नाक्‍यावरील बाजार समितीच्या आवारात विक्रीस आणतात. ग्राहक आले तर ते ग्राहकांना शेतमाल विकतात. पोलिस, महापालिका कर्मचारी शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीस मनाई करतात. शेतकऱ्यांना मारहाण करतात. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन वाहनांच्या काचेवर काठ्या मारतात. शेतकऱ्यांचा शेतमाल जप्त करतात. यामुळे सध्याचे चित्र म्हणजे, "बाप भिक मागु देत नाही आणि आई काम करू देत नाही' असे झाले आहे. 

वस्तुतः शेतकरी आपला शेतमाल कोणत्याही शहरात, कुठेही विक्री करु शकतो. केंद्र सरकारने तसा अध्यादेश काढला आहे. शहरात मात्र याउलट स्थिती निर्माण झाली आहे. महापालिका व पोलिस वाहन दिसले की शेतकरी अक्षरशः आपली वाहने घेऊन पळत सुटतात. एखाद्या अट्टल गुन्हेगारापेक्षाही जास्त वाईट वागणूक शेतकऱ्यांना मिळते. नाशिक रोड, पंचवटीसह विविध पोलिस ठाण्यात शेतकऱ्यांची वाहने जप्त केली जातात. यासंदर्भात शेतकऱ्यांनी असंख्य तक्रारी केल्या आहेत. स्थानिक प्रशासन दखल घेत नसल्याने राज्य शासनाने त्यात हस्तक्षेप करावा, या मागणीसाठी शेतकरी आता जिल्हाभर रास्ता रोको करतील असा ईशारा भाजपचे नेते, कादवा सहकारी साखर कारखाना संचालक सुनील केदार यांनी दिला आहे. 
... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=zOkpGagCTKIAX87QsWa&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=0ebe751f396f712fc9a8a97964a8574d&oe=5F30FAA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com