राज ठाकरे म्हणाले, मंदिरे उघडली तर `कंट्रोल` कोण करणार? 

मंदिरे उघडण्यात यावीत हा प्रश्‍न एकट्या त्र्यंबकेश्‍वरचा नाही. सगळ्यांच धार्मिक स्थळांचा आहा. त्यामुळे मंदिरे उघडली व धार्मिक विधी सुरु झाले, तर कोरोनाच्या कालावधीत त्यावर कंट्रोल कोण ठेवणार?.
राज ठाकरे म्हणाले, मंदिरे उघडली तर `कंट्रोल` कोण करणार? 

नाशिक : मंदिरे उघडण्यात यावीत हा प्रश्‍न एकट्या त्र्यंबकेश्‍वरचा नाही. सगळ्यांच धार्मिक स्थळांचा आहा. त्यामुळे मंदिरे उघडली व धार्मिक विधी सुरु झाले, तर कोरोनाच्या कालावधीत त्यावर कंट्रोल कोण ठेवणार?. त्याचे नियोजन आधी केले पाहिजे, असा प्रश्‍न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

त्र्यंबकेश्‍वरचे मंदिर उघडण्यात यावे आणि धार्मिक विधी पुन्हा सुरु करावेत या मागणीसाठी त्र्यंबकेश्‍वर नगरपालिकेच्या नगरसेवकांनी आज राज ठाकरे यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले. राज्यातील व्यायामशाळा सुरु कराव्यात अशी मागणी राज ठाकरे यांनी नुकतीच राज्य शासनाकडे केली होती. त्यावर यासंदर्भात नियमावली तयार करुन त्याविषयी निर्णय घेण्याचे संकेत राज्य शासनाने दिले होते. त्यामुळेच गेली चार महिने मंदिर बंद असल्याने येथील नगरसेवकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यामुळे नगरसेवकांनी श्री. ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी नगरसेवकांच्या चर्चेनंतर श्री. ठाकरे म्हणाले, प्रश्‍न फक्त मंदिरांचा नाही. कारण धार्मिक विधी घरात राहून देखील केली जाऊ शकते. मात्र मंदिर उघडल्यावर मशीदी उघडून रस्त्यावर नमाज पठन सुरु झाले तर काय?. चर्चमध्ये कार्यक्रम सुरु होतील. या सगळ्यांना कंट्रोल कोण करणार? त्याची जबाबदारी कोण घेणार?. त्यामुळे याबाबत पुरोहितांनी स्वतः पुढाकार घेऊन धार्मिक विधी सुरु झाले, तर सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार?. मंदिरात पाळणार मात्र मंदिराबाहेर जी गर्दी होईल, त्याचे नियंत्रण कोण करणार?. याविषयी एक प्रस्ताव तयार करावा. तो मला द्या. दोन दिवसांनी यासंदर्भात मी आपणास या निर्णयाबाबत माहिती देतो, असे आश्‍वासन देईन, असे सांगतिले. 

त्र्यंबकेश्‍वर पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी, बापू पेंडाळे, मनोज थेटे यांसह विविध पुरोहितांनी आज सकाळी श्री. टाकेर यांची भेट घेऊन चर्चा केली. शहरांत मॉल उघडण्यात आले आहेत. अनेक व्यावसाय सुरु झाले आहेत. मग मंदिरांवरच बंधने का लादली जात आहेत. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन आम्ही णंदिरांतील विधी करण्यास तयार आहोत. त्यामुळे आपण यासंदर्भात पुढाकार घ्यावी अशी विनंती या सदस्यांनी केली. या शिष्टमांडळाने श्री. ठाकरे यांचा महावस्त्र देऊन मंत्रोच्चारात सत्कार केला. 
...  

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=ydmVoWINRzkAX8Sdyxw&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=535487a3125d1fa933a630ae9f8ba9c4&oe=5F6070A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com