डॉ. अजित नवले यांना गोळ्या घालण्याची धमकी देणारा कोण? - Who warn Dr Ajit Navle to shoot on Social Media. Farmers Politics | Politics Marathi News - Sarkarnama

डॉ. अजित नवले यांना गोळ्या घालण्याची धमकी देणारा कोण?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 30 जानेवारी 2021

दिल्लीतील शेतकरी आंदोलन वादात व चर्चेत अडकले असताना त्यावर प्रतिक्रीया देणा-यांतही शाब्दीक चकमकी झडू लागल्या आहेत. याच विषयावरुन फेसबुकवर डॉ. अजित नवले यांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली. दोघांनी त्याला लाईक्स दिले.

नाशिक : दिल्लीतील शेतकरी आंदोलन वादात व चर्चेत अडकले असताना त्यावर प्रतिक्रीया देणा-यांतही शाब्दीक चकमकी झडू लागल्या आहेत. याच विषयावरुन फेसबुकवर डॉ. अजित नवले यांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली. दोघांनी त्याला लाईक्स दिले. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले असुन यासंदर्भात आरोप, प्रत्यारोपांची शक्यता आहे.   

यासंदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव  माजी आमदार नरसय्या आडम यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य आणि महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस, महाराष्ट्रातील एक लढाऊ आणि प्रामाणिक शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांना "नीट राहा नाहीतर गोळ्या घालीन" या शब्दांत एका इसमाने काल फेसबुकवर पोस्ट टाकली. इतर दोघा जणांनी ती लाईक केली. या तिघांपैकी किमान दोन जण तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत असे आम्ही केलेल्या तपासाअंती कळले. 

देशभर सध्या भाजपच्या केंद्र सरकारविरुद्ध सुरू असलेल्या अभूतपूर्व देशव्यापी शेतकरी आंदोलनाच्या आणि हे आंदोलन दडपून टाकण्याच्या केंद्र सरकारच्या कुटील कारस्थानाच्या पार्श्वभूमीवर धमकीची ही पोस्ट टाकण्यात आली आहे हे सूचक आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष डॉ. नवले यांना दिलेल्या धमकीचा निषेध करीत आहे. महाराष्ट्रातील सर्व देशप्रेमी, लोकशाही जनतेला या घटनेचा तीव्र निषेध करण्याचे आवाहन करत आहे. फेसबुकवरून अशा धमक्या देणाऱ्या व त्या लाईक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध माकप ताबडतोब कायदेशीर कारवाई सुरू करणार आहे.
...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख