अक्षयकुमारसाठी हेलीपॅडला परवानगी दिली कोणी ! भुजबळांचा नांगरे-पाटलांवर निशाणा ?

खरे तर सध्या सगळे मंत्री देखील रस्त्याने प्रवास करतात. असे असतांना अक्षयकुमार हेलीकॉप्टरने आला कसा. त्याला परवानगी दिली कोणी. त्याच्यासाठी हवाई वाहतुकीची परवानगी कशी मिळाली. हेलीपॅडची परवानगी कोणी दिली ?.
अक्षयकुमारसाठी हेलीपॅडला परवानगी दिली कोणी ! भुजबळांचा नांगरे-पाटलांवर निशाणा ?

नाशिक : सध्या सगळे मंत्री रस्त्याने प्रवास करतात. अशा स्थितीत अभिनेता अक्षकुमारसाठी हेलीपॅड उभारण्याची परवानगी दिली कोणी ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

प्रशासनाला हे माहिती नसेल, तर त्यांनी माहिती घ्यावी. याबाबत माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

भुजबळ यांनी येथील ठक्कर डोम येथे उभारण्यात येणारे "कोविड 19' हे पाचशे खाटांच्या क्षमतेच्या रुग्णालयाच्या उभारणीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या. या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. 

अभिनेता अक्षयकुमार नाशिकला येऊन गेला, त्यासाठी शहरातील पोलिसांनी त्याला संरक्षण दिले होते. याविषयी विचारले असता भुजबळ म्हणाले, "" मला देखील याबाबत माहिती नाही. आज वर्तमानपत्रांत बातम्या आल्या, तेव्हा मला कळले. खरे तर सध्या सगळे मंत्री देखील रस्त्याने प्रवास करतात. असे असतांना अक्षयकुमार हेलीकॉप्टरने आला कसा. त्याला परवानगी दिली कोणी. त्याच्यासाठी हवाई वाहतुकीची परवानगी कशी मिळाली. हेलीपॅडची परवानगी कोणी दिली ?.

मुख्य म्हणजे तो आला अन्‌ इगतपूरी येथील रिसॉर्ट कसे व कोणी खुले केले. कारण सध्या कोरोनाचे लॉकडाऊन सुरु आहे. अशा वेळी जे घडले ते कसे घडले याची माहिती घेण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबत माहिती नाही, असे प्रशासनाने सांगितले. अभिनेता अक्षय कुमार इगतपूरीला ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात आला होता. मात्र त्याच्यासाठी शहरातील पोलिस यंत्रणा राबली. एखादा गुन्हा घडला तर हद्दीचा वाद पोलिस करतात. एक फुट फुटपाथ असेल तर ते म्हणतात, ती माझी हद्द नाही. अभिनेता अक्षयकुमारसाठी सगळी हद्द, कार्यक्षेत्र सगळे कोणी बाजुला ठेवले, याची माहिती घेण्याच्या सूचना दिल्याचे भुजबळ म्हणाले. 

पालकमंत्री भुजबळ यांच्या या भूमिकेने अप्रत्यक्षरित्या पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना कानपिचक्‍या दिल्या आहेत. या चौकशीचा रोख थेट त्यांच्याकडे असल्याने ते अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com