एसपी सचिन पाटील यांची बदली थांबविणारा मी कोण? 

पोलिसअधीक्षक सचीन पाटील यांची बदली रद्द करण्यासाठी मला निवेदन आले आहे. पण मी त्या खात्याचा मंत्री नाही. पोलिस अधीक्षक बदल्यांचा विषय गृहमंत्र्यांच्या खात्याचा विषय आहे. त्या खात्यांचे सक्षम मंत्री आहे. बदली थांबविणारा मी कोण? असे सांगत छगन भुजबळ यांनी हा विषय टोलावून लावला.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : पोलीस अधीक्षक सचीन पाटील (i had got a request to cancel S.P. Sachin Patil transfer) यांची बदली रद्द करण्यासाठी मला निवेदन आले आहे. पण मी त्या खात्याचा मंत्री नाही. (I am minister but do not have that portfolio) पोलिस अधीक्षक बदल्यांचा विषय गृहमंत्र्यांच्या खात्याचा विषय आहे. (That was Home departments subject) त्या खात्यांचे सक्षम मंत्री आहे. (Home minister hade capable minister) याशिवाय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहे. मी बदली थांबविणारा कोण ? असे स्पष्ट करीत, पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी हा विषय टोलावून लावला. 

पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदली रोखण्यासाठी शहरातील काही सामाजिक संघटना सक्रिय झाल्या आहे शेतकऱ्यांचे व्यवसाकडील पैसे काढून देण्यासाठी श्री पाटील सक्रीय होते. 

त्यामुळे त्यांची बदली थांबवावी अशी मागणी आहे. त्यानुषंगाने श्री भुजबळ यांनी हा विषय गृहमंत्र्यांकडील असल्याचे सांगत हात झटकले. कोरोना आढावा बैठकीनंतर श्री भुजबळ बोलत होते. ओबीसी आरक्षणावरुन निवडणूका पुढे ढकलता येणार नाही. असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश झाला आहे. 

याविषयी विचारले असता श्री भुजबळ म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने निवडणूका पुढे ढकलण्याचा विषय नाही. कोरोना निर्बंधामुळे निवडणूका पुढे ढकलल्या असतांना याच लांबलेल्या काळात ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लावण्याचे काम संपवून टाकू असे शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने याविषयी मुख्यमंत्र्यासह राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष सर्वसहमतीने पुढील निर्णय घेतील. 
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com