नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या (बुधवारी) जिल्हा नियोजन समित्यांच्या बैठका होणार आहेत. यात उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांचे लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. गेले वर्षभर कोरोनाना ठप्प झालेल्या विकासाला त्यांच्या बैठकीमुळे गती मिळेल का?. याची सगळ्यांना उत्सुकता आहे. विशेषतः नाशिकच्या रखडलेल्या प्रकल्पांसाठी निधीचे गिफ्ट मिळले का यावर अंदाज बांधले जात आहेत.
उत्तर महाराष्ट्र तील पाचही जिल्ह्यातील नियोजन निधीवर उद्याच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. अधिवेशनापूर्वी राज्यातील विविध जिल्ह्यातील नियोजन समितीच्या बैठका घेऊन प्रत्येक जिल्ह्यासाठी नियतव्यय मंजूर करण्याचा या बैठकीत विभागाला वाढीव निधीची अपेक्षा आहे. पाचही जिल्ह्यातील पालकमंत्री त्यासाठी प्रयत्नशील आहे. कोरोना कपात मागील आर्थिक वर्ष विभाग, राज्यच नव्हे तर देशाची परीक्षा पहाणारे होते, कोरोना महामारीमुळे रोजगार गेले तसे आर्थिक अरिष्ट कोसळली त्यात महसूल कमी झाला परिणामी विकास कामांचा मोठा निधी कोरोना नियंत्रणासाठी वापरण्यात आला. सहाजिकच यंदा वाढीव निधी मिळविण्यासाठी गेल्या वर्षीची कोरोना कपात हे प्रमुख कारण आहे.
साहित्य संमेलन
साहित्य संमेलन नाशिक ला पुढील महिन्यात 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. स्वतः पालकमंत्री छगन भुजबळ त्याचे स्वागताध्यक्ष आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक आमदारांनी दहा लाखांचा निधी साहित्य संमेलनाला द्यावा अशी मागणी आहे. मात्र श्री भुजबळ यांच्या मागणीला अजून तरी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेसच्या जिल्ह्यातील सगळ्या आमदारांनी देखील निधी देण्याबाबत प्रतिसाद दिलेला नाही. शिवसेनेच्या एका आमदारांने पाच लाखाचा निधी दिला आहे. भाजपच्या सीमा हिरे यांनी दहा लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. अन्य आमदारांचा प्रतिसाद मिळालेला नाही. नाशिक जिल्ह्याचा 151 वा वाढदिवस मावळत्या वर्षात होता. कोरोनामुळे त्याचे कार्यक्रम झाले नाही. यंदा त्याचे भरगच्च नियोजन आहे. असे अनेक प्रकल्प विचाराधीन आहेत. त्यांचे भविष्य उद्याच्या बैठकीत काय होते, यावर अवलंबून आहे.
...

