मुख्यमंत्री घरातून काम करतात त्याचे काय? - What about Cm works from home, BJP Replys to NCP leader | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

मुख्यमंत्री घरातून काम करतात त्याचे काय?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 मे 2021

नाशिक  शहर कोरोनामुक्त करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर हे राज्यात कोरोनाची स्थिती जाणून घेण्यासाठी फिरत आहेत. त्यामुळे ज्यांचे मुख्यमंत्री घरात बसुन असतात

नाशिक : नाशिक  शहर कोरोनामुक्त करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर हे राज्यात कोरोनाची स्थिती जाणून घेण्यासाठी फिरत आहेत. त्यामुळे ज्यांचे मुख्यमंत्री घरात बसुन असतात त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये असे उत्तर भारतीय जनात पक्षाचे गटनेते सतीश सोनवणे आणि जगदीश पाटील यांनी दिले आहे.

राष्ट्रवादी कॅांग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यावर टिका केली होती. येताना रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणायला हवे होते असे विधान त्यांनी केले होते. त्यावर भाजपच्या नेत्यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. ते म्हणाले, श्री. टाकरे यांना सांगू इच्छितो की, आम्ही मुंबईला अन्न व औषध पविभागाच्या आयुक्तांना दिड तास घेराव घातलाय ठिय्या आंदोलन केले. त्यानंतरच नाशिकला प्रती दिन दोन हजार रेमडीसीव्हीर इंन्जेक्शनच्या मात्रा व १०० टन ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्याचे लेखी आश्वासन मिळाले आहे. ज्यांना हे ज्ञात नाही ते दोघेही नेते बालिश बुद्धीने बोलत आहे. कोरोनाच्या संकट काळात एक वर्षापासून बिळात लपून बसलेले यांनी उगाच राजकारण न करता त्यांनी आपले शब्द जपून वापरावे.  

कोरोनाच्या काळात श्री. फडणवीस महाराष्ट्रात दोन वेळा दौरा करून रुग्णसेवेची परिस्थिती जाणून घेऊन प्रशासनाला सूचना करीत आहेत. परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये सकारात्मकता निर्माण झालेली आहे. आपले मुख्यमंत्री मात्र घरात बसून कारभार हाकत आहे

नाशिक शहराला रेमडीसीव्हीर व ऑक्सिजनचा तुटवडा होता हा मुंबई येथे भाजप पदाधिकारी यांनी आंदोलन केल्यामुळेच मिळालेला आहे. शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही सत्ताधारी पक्षांना आमचे आव्हान आहे की, त्यांनी बडबड करण्यापेक्षा राज्याकडून महापालिकेला कोवीडसाठी व शहरासाठी १०-२० कोटींचा निधी आणावा मग यांचे खरे प्रेम कळेल. निधी तर आणयचा नाही मात्र घरात बसून हे दोन्ही नेते बडबड करतात. त्यामुळे यांनी घरातच बसावे. नाशिक शहरातील नागरीकांची काळजी करू त्यांची काळजी करण्यास आम्ही समर्थ आहोत.
....
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख