ढोंगी आमदार गोपीचंद पडळकरांचा हिशोब करू 

गेल्या चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी अतिशय हीन दर्जाची भाषा भाजपचे विधान परिषद सदस्य पडळकरकरीत आहेत. अतीशय हीन भाषेचा वापर ते करीत आहेत. कर्तुत्वशूण्य व ढोंगी पडळकरांना चर्चेत राहण्यासाठी हे सर्व करावे लागत आहे. मात्र राष्ट्रवादी महिला कॅांग्रेस त्यांना योग्य धडा शिकवेल, असा इशारा शहर अध्यक्षा अनिता महेस भामरे यांनी दिला आहे.
Padalkar- Bhamre
Padalkar- Bhamre

नाशिक : गेल्या चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी अतिशय हीन दर्जाची भाषा भाजपचे विधान परिषद सदस्य पडळकर करीत आहेत. (Gopichand Padalkar is making classles statements)  अतीशय हीन भाषेचा वापर ते करीत आहेत. कर्तुत्वशूण्य व ढोंगी पडळकरांना चर्चेत राहण्यासाठी हे सर्व करावे लागत आहे. मात्र राष्ट्रवादी महिला कॅांग्रेस (NCP women wing take cognizance of it) त्यांना योग्य धडा शिकवेल, असा इशारा शहर अध्यक्षा अनिता महेश भामरे (Anita mahesh Bhamre) यांनी दिला आहे.  

गोपीचंद पडळकर यांचे उपद्रवमुल्य हेच त्यांचे भाजपमध्ये स्थान आहे. हे मूल्य संपले तर त्यांना गल्लीतील शेमडं पोरगही विचारणार नाही. त्यामुळेच त्यांचे असे वर्तन सुरु आहे. ते भाजपला मान्य आहे काय?. ही भाजपीच भाषा आहे काय? असा प्रश्न सौ. भामरे यांनी केला. 

त्या म्हणाल्या, श्री. पडळकर काय बोलतात, हे त्यांनाही ठाऊक नसाव. कारण ते बोलत नाहीत तर एखादा मोनरुग्ण बडबडत असतो, तसे त्यांचे वक्तव्य व वर्तन दिसते आहे. यातून पडळकरांना काय म्हणायचे आहे. छत्रपती शाहू,  फुले, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेवून पुरोगामी विचारांचा पुरस्कार करून शरद पवार समाजात आणि पक्षात काम करतात. मात्र पडळकर जे बोलतात, त्यामुळे पडळकरांचा हिशेब  राष्ट्रवादी महिला काँग्रेस शंभर टक्के करील, असे शहराध्यक्षा भामरे म्हणाल्या. 

कोणत्याही राजकीय कार्यकर्ता, नेत्याची पात्रता त्याला असलेला लोकांचा पाठींबा यावर ठरते. श्री. पडळकर यांची अनामत रक्कम जप्त करून बारामतीकरांनी त्यांचे मुल्य काय हे दाखवून दिले आहे. 

श्री. पवार यांनी कधीही पंतप्रधान होण्याची ईच्छा बोलून दाखवली नाही. राजकीय क्षेत्रात काम करत असतांना उच्च पद मिळवण्यासाठी प्रयत्न करणे यात गैर काहीच नाही. राष्ट्रवादी  काँग्रेस पक्षातील, महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनतेची देखील तशी ईच्छा आहे. महाराष्ट्रातून एकदा साहेबांना पंतप्रधान पदावर काम करण्याची संधी मिळावी. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभेतील खासदारांची संख्या पाहता ते शक्य नाही हे पवार साहेब आवर्जून सांगतात. त्यामुळे पडळकर तुम्ही साहेबांना नेता मानता का नाही यात आम्हाला स्वारस्य नाही, आम्ही कधीच साहेबांना आमच्या पितृतुल्य पित्याचा दर्जा दिला आहे. पडळकर जी भाषा वापरतात, ती सभ्यतेची नसल्याने लोक त्याला गांभिर्याने घेणार तर नाहीच मात्र हा विनोद सुद्धा टाकाऊच ठरेल. आम्ही मात्र पडळकरांना चोख उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणरा नाही. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com