छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणावा  - We should keep history of Shivaji maharaj in front of world | Politics Marathi News - Sarkarnama

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणावा 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व त्यांचा इतिहास विसरता कामा नये. महाराजांनी केलेलं कर्तृत्व आणि त्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी आपण सर्वांनी अविरतपणे काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

नाशिक : शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व त्यांचा इतिहास विसरता कामा नये. महाराजांनी केलेलं कर्तृत्व आणि त्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी आपण सर्वांनी अविरतपणे काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

शिवजन्मोत्सवा निमित्त मंत्री भुजबळ यांनी शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचवटी शिवजन्मोत्सव समितीकडून उभारण्यात आलेल्या पासष्ट फूट उंची असलेली मूर्ती साकारण्यात आली. त्याची गिनीज बुक मध्ये नोंद झाली त्याबद्दल तसेच सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरा फुटी टाक निर्माण करण्यात आले. याचीही त्याचीही नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली त्याबद्दल या दोनही समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. 

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व सर्वप्रथम जगासमोर आणण्याचे काम महात्मा जोतीराव फुले यांनी केले. त्यांनी रायगडावरील महाराजांची समाधी शोधून काढली पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केली. त्यांचे हे कार्य अविरत पुढे सुरू राहण्यासाठी प्रयत्न करावेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. स्वराज्याची आदर्श कल्पना त्यांनी केली. त्यांनी केलेले हे कार्य संपुर्ण समाजाला प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या कार्याचा अभ्यास आपल्याला करायला हवा. त्यासाठी दरवर्षी महाराजांचा ग्रंथ घेऊन वाचन सुरू करावे. पोथी पुराणातून बाहेर पडावे. कुठल्याही अंधश्रद्धेत अडकून पडू नये. 

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार सीमा हिरे, माजी आमदार जयवंतराव जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे,बाळासाहेब कर्डक, शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, नगरसेवक गजानन शेलार, गुरुमित बग्गा, मुकेश शहाणे, मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, नगरसेवक दिनकर पाटील, योगेश शेवरे, कांताताई शेवरे, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, नाशिक महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, पंचवटी शिवजयंतीचे अध्यक्ष मामा राजवाडे, शंकर मोकळ, सचिन पिंगळे, चेतन शेलार, पवन कातकाडे, जीवन रायते, विक्रम कोठुळे, दीपक बडगुजर, तानाजी जायभावे,लक्ष्मण जायभावे, शरद आहेर, संतोष सोनपसारे, पवन मटाले, हर्षदा सोनवणे, अमोल नाईक, मुकेश शेवाळे, नाना सोमवंशी, आशिष हिरे, कुणाल बागडे, योगेश गांगुर्डे, सुनील आहेर,संजय खैरनार आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. 
... 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख