शेवटचा माणूस कोरोनामुक्त होईपर्यंत काळजी घ्या ! - We shall fight till last covid-19 patient Recover | Politics Marathi News - Sarkarnama

शेवटचा माणूस कोरोनामुक्त होईपर्यंत काळजी घ्या !

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

सबंध जगात काही महिन्यांपासून कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. सध्या रुग्णसंख्येचा दर घटत असल्याने एक सकारात्मकता आली आहे. तरीही शेवटचा माणूस कोरोनामुक्त होईपर्यंत आपण काळजी घेणे आवश्यक आहे, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

नाशिक : सबंध जगात काही महिन्यांपासून कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. सध्या रुग्णसंख्येचा दर घटत असल्याने एक सकारात्मकता आली आहे. तरीही शेवटचा माणूस कोरोनामुक्त होईपर्यंत आपण काळजी घेणे आवश्यक आहे, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

श्री भुजबळ यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गवंडगाव ते भागवत वस्ती रस्त्याचे भूमिपूजन झाले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, कोरोनामुळे राज्याचा अधिकाधिक खर्च हा आरोग्य विभागासाठी खर्च होत आहे; कारण 'जान है तो जहाँ है'. जर माणूस असेल तरच सर्व काही आहे. विकासकामे होत जातील आणि शासनस्तरावर आपण प्रयत्न करून मतदारसंघात अधिकाधिक विकास कामे होण्यासाठी निधी आणू आणि ते विकासकामे मार्गी लागण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समाजात काही ठिकाणी अटकाव करण्यात आला होता; मात्र, अर्थव्यवस्था सुरू रहावी यासाठी शासन हळूहळू सर्व पूर्वपदावर आणत असून लवकरच सर्व व्यवहार पूर्व पदावर येतील. शेतकऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर  बंधने आली तर त्याचा परिणाम हा थेट शेतकऱ्यांवर होतो. त्यामुळे शेतकरी हिताचे निर्णय केंद्र सरकारने घ्यावे, असेही यावेळी पालकमंत्री श्री भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, कृषी सभापती संजय बनकर, मुंबई बाजार समिती संचालक जयदत्त होळकर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, बाजार समितीचे संचालक मकरंद सोनवणे, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख