आम्ही आहोत, राज्यपालांनी अर्णबची चिंता करु नये ! - we are tgere, Governer shall not worried about Arnab Goswami | Politics Marathi News - Sarkarnama

आम्ही आहोत, राज्यपालांनी अर्णबची चिंता करु नये !

संपत देवगिरे
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

राज्यपाल सध्या महाराष्ट्रातील लहान लहान गोष्टींविषयी देखील लक्ष ठेवतात. हे चांगले आहे, याचा अर्थ त्यांच्या महाराष्ट्राच्या प्रश्‍नांकडे चांगले लक्ष आहे असाच होतो, असा चिमटा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काढला.

 
नाशिक : राज्यपाल सध्या महाराष्ट्रातील लहान लहान गोष्टींविषयी देखील लक्ष ठेवतात. हे चांगले आहे, याचा अर्थ त्यांच्या महाराष्ट्राच्या प्रश्‍नांकडे चांगले लक्ष आहे असाच होतो, असा चिमटा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काढला. ते म्हणाले, राज्यपालांनी रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांची काळजी करु नये. सरकार त्यांची उत्तम काळजी घेते आहे. 

श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत आज येथे कोरोना विषयक आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपल्या नेहेमीच्या शैलीत राजकीय फटकेबाजी देखील केली. राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली होती. यासंदर्भात श्री. भुजबळ म्हणाले, राज्यपाल या विषयात लक्ष घालत आहेत, ही उत्तम गोष्ट आहे. राज्यपाल महोदय सर्व लहान लहान गोष्टीत लक्ष घालताय, यामुळे त्यांचं राज्यावर अतिशय चांगले लक्ष आहे असा होतो. खरोखर तसं असेल तर त्यांनी अर्णब गोस्वामींची काळजी करु नये. त्यासाठी आम्ही आहो. राज्य सरकार त्यांच्या आरोग्याबाबत जागरुक आहे. सरकारी डॉक्‍टर गोस्वामींची वैद्यकीय तपासणी करतील. आवश्‍यकता असल्यास हॉस्पिटलमध्ये न्यायचं की नाही, हे डॉक्‍टरच सांगतील. आम्ही अर्णब गोस्वामींची चांगली काळजी घेऊ. 

गेल्या आठवड्यात राज्यपाल नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी श्री. बुजबळ यांनी त्यांना नाशिकला राजभवन बांधावे असे आवाहन केले होते. त्याबाबत विचारल्यावर श्री. भुजबळ म्हणाले, ते नाशिकला राजभवन बांधणार, की नाही ते अजून राज्यपालांनी सांगितलेल नाही. आपण राज्यपालांना आमंत्रण दिलंय. सध्या मुंबईतल्या राजभवनात जुन्या इमारती पाडून नव्या इमारती बांधण्याचं काम सुरु आहे. राज्यपाल स्वतः त्याकडे लक्ष देत आहेत. एकूण परिस्थिती चांगली आहे. 

दिवाळीत फटाके टाळा 
यावेळी कोरोना विषयक सुरु असेलल्या उपाययोजना तसेच प्रशासनाने घेतलेल्या विविध निर्णयांचा त्यांनी आढावा गेतला. त्यांनी नागिरकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळी आनंदात साजरी करा. मात्र दिवाळीत मोठ्या आवाजाचे फटाके फोडणं टाळा, शक्‍यतो फटाके वापरुच नका, असे आवाहन त्यांनी केले. सर्व दुकानदारांनी "नो मास्क, नो एन्ट्री' या सुचनेचे तंतोतंत पालन करावे. कोरोनाविषयक प्रशासनाने दिलेल्या नियमांचं पालन कराव. मास्क नसलेल्या ग्राहकाला दुकानात प्रवेश देऊ नये. त्यांना वस्तु विक्री करु नये. मास्क न वापरणाऱ्या तसेच बेफिकीरपणे वागणाऱ्यांवर कारवाईच्या सुचना देण्यात आले आहे. पंजाबमधील शेतकरी आंदोलनामुळे रेशनवरील धान्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख