पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण - Water Supply Minister Gulabrao Patil infected with corona | Politics Marathi News - Sarkarnama

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 मार्च 2021

गुलाबराव पाटील यांना कारोनाची लागण झाली आहे.

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना कारोनाची लागण झाली आहे. जळगाव महापालिकेत महापौर व उपमहापौर निवडीत सत्तांतर करण्याची भूमिका त्यांनी बजावली आहे. गेल्या दोन दिवसापासून ते मुंबईतच आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी सोशल मीडियावरून सांगितले आहे. 'आपल्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी,' असे आवाहन त्यांनी केले आहे. ते मुंबईत कोणत्या रुग्णालयात उपचार घेणार आहेत, याची माहिती मिळाली नाही.

"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व आपली कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती," असे टि्वट गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
 
माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप होता त्यांनी कोरोनाची तपासणी केली, असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ते जामनेर येथे गृहविलगीकरणात आहेत. आज महाजन यांनी टि्वट करीत पुढील उपचारासाठी मुंबईला जाणार असल्याचे सांगितले आहे. 

आपल्या टि्वटमध्ये गिरीश महाजन म्हणतात की, दोन दिवसांपूर्वी ताप आल्यानंतर कोरोना चाचणी केली असता, मला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच क्वारंटाईन होऊन उपचार
घेत होतो. पुढील उपचारासाठी लवकरच मुंबई येथील सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालयात दाखल होत आहे.

दररोज ३ लाख लस दिली पाहिजे

राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना काल केंद्राने लसीकरणासाठी मान्यता दिली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दर दिवशी येणाऱ्या रुग्णांपेक्षा सध्याची संख्या उच्चांकी असून राज्यातील जिल्हा प्रशासनाने अतिशय वेगाने रुग्ण आणि त्यांचे संपर्क शोधणे, निर्बंधांचे आणि आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी काल बैठकीत दिले आहेत. कोविड लसीकरणात महाराष्ट्र हा संपूर्ण देशात राजस्थाननंतर दुसऱ्या क्रमांकावर असल्याची बाब समाधानकारक आहे. मात्र दर दिवशी ३ लाख लस दिली पाहिजे यादृष्टीने नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागास सांगितले आहे. 

Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख