नारायण राणेच पांढऱ्या पायाचे मंत्री : गुलाबराव पाटलांचा टोला

आज राज्यावर संकट आहे.राज्यातील माणसावर संकट आहे.
Water Supply Minister Gulabrao Patil criticizes Union Minister Narayan Rane
Water Supply Minister Gulabrao Patil criticizes Union Minister Narayan Rane

जळगाव : कोकणातील नारायण राणे केंद्रात मंत्री झाले अन् कोकणावर संकट आले. खऱ्या अर्थाने तेच पांढऱ्या पायाचे मंत्री आहेत, अशी खरमरीत टीका राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे बोलताना केली. (Water Supply Minister Gulabrao Patil criticizes Union Minister Narayan Rane)

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आमदार निधीतून दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून प्रत्येक संकट महाराष्ट्रावर येत आहे. ते पांढऱ्या पायाचे आहेत, असा आरोप राणे यांनी केला होतो. त्याला उत्तर देताना गुलाबराव पाटलांनी राणे यांच्यावर पलटवार केला.

पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले की, नारायण राणे हे कोकणातील आहेत. ते नुकतेच केंद्रात मंत्री झाले अन् कोकणावर संकट आले. त्यामुळे नारायण राणे हेच खऱ्या अर्थाने पांढऱ्या पायाचे मंत्री आहेत.

राज्यावर संकट आलेले असताना आता राजकारण करण्याची वेळ नाही. आज राज्यावर संकट आहे, राज्यातील माणसावर संकट आहे, त्या मुळे तो कोणत्या पक्षाचा आहे, त्यापेक्षा तो व्यक्ती आहे आणि माणसाने माणसाला मदत करावी, हाच धर्म आहे, असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. माणसाला माणसाने मदत करण्यासाठी एकजुटीने लढा दिला पाहिजे, अपेक्षाही पाटील यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.

ते म्हणाले की, राजकारण करण्यासाठी भरपूर आखाडे आहेत. संकट निघून गेल्यावर तुम्ही तुमच्या पक्षाचा झेंडा घेऊन उतरा; आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा घेऊन उतरू. जनता जो आशीर्वाद देते, ते सर्वांनी मान्य करायचा असतो. राजकारण करणाऱ्यांनी राज्य संकट असताना, राज्यातील लोक संकटात असताना थोडा तरी विचार करावा. आपल्या घरातील जर कोणी या संकटात सापडलं असतं, त्यांच्या या गोष्टी लक्षात आल्या असत्या. मात्र, आज संकट काळात सर्वांनी एकजुटीने कार्य करावे,असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com