खानदेशात शिवसेना कात टाकणार..जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे, हर्षल माने  - Vishnu Bhangale, Hershal Mane as Shiv Sena Jalgaon district chief | Politics Marathi News - Sarkarnama

खानदेशात शिवसेना कात टाकणार..जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे, हर्षल माने 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 जून 2021

मराठवाडा मिळालेल्या यशाचा पॅटर्न आता खानदेशात राबविण्यात येत आहे.

जळगाव :  राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी शिवसेनेने आता कंबर कसली आहे. मराठवाडा मिळालेल्या यशाचा पॅटर्न आता खानदेशात राबविण्यात येत आहे. तीन विधानसभा क्षेत्रासाठी एक जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यात येत आहे. जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  Vishnu Bhangale, Hershal Mane as Shiv Sena Jalgaon district chief

शिवसेना एके काळी खानदेशात बळकट होती. याच शिवसेनेचा बोट धरून भाजप खानदेशात वाढली, परंतु शिवसेना फारशी वाढली नाही. परंतु आता खानदेशात शिवसेनेने कात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यात शिवसेनेने तीन विधानसभा क्षेत्रासाठी एक जिल्हाप्रमुख नियुक्त केला होता. त्यामुळे शिवसेनेला विधानसभेत चांगले यश मिळाले होते. आता खानदेशात हा पॅटर्न  राबविण्यात येत आहे.

TWITTER : राहुल गांधींनी अनेक नेत्यांना केलं अनफॅालो..

खानदेशात लोकसभा क्षेत्र निहाय जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे जळगाव, रावेर लोकसभा मतदार संघासाठी दोन जिल्हा प्रमुख होते. आता विधानसभा क्षेत्र निहाय जिल्हाप्रमुख असणार आहेत. तीन विधानसभेसाठी एक जिल्हा प्रमुख नियुक्त करण्यात आला असून त्यावर एक जिल्हा संपर्क प्रमुख असेल.

जळगाव जिल्ह्यात जळगाव लोकसभा क्षेत्रात नवीन पद्धतीने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.  जळगाव, अमळनेर, जळगाव ग्रामीण, विधानसभा क्षेत्र जिल्हाप्रमुखपदी विष्णु भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, या विधानसभा क्षेत्रांसाठी हर्षल माने यांची जिल्हाप्रमुखपदी  नियुक्ती करण्यात आली आहे. 

विष्णु भंगाळे हे जळगाव महापालिकेत शिवसेना नगरसेवक आहेत. ते माजी महापौर आहेत. कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य आहेत. तर हर्षल माने हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. माजी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ हे आता जिल्हा संपर्क प्रमुख असतील. तर आता रावेर लोकसभा क्षेत्रात आता अशाच पद्धतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
 Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख