कोरोना उपचारासाठी विराफीन, मोनोक्लोनल औषध गुणकारी - Virafin & monoclonanal drugs are effective on COVID, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना उपचारासाठी विराफीन, मोनोक्लोनल औषध गुणकारी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

कोरोना विरोधात विज्ञान आणी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेण्यात येईल. कोविड रुग्णांवर उपचारासाठी विराफीन, मोनोक्लोनल हे नवीन औषध उपचारासाठी इफेक्टिव्ह असल्याचं टास्क फोर्सच्या निदर्शनास आले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली.

नाशिक : कोरोना विरोधात विज्ञान आणी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेण्यात येईल. (science & Technology will be used against covid19) कोविड रुग्णांवर उपचारासाठी विराफीन, मोनोक्लोनल (Virafin & Monoclonal useful on covid19) हे नवीन औषध उपचारासाठी इफेक्टिव्ह असल्याचं टास्क फोर्सच्या निदर्शनास आले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram kunte) यांनी दिली.  

आज स्मार्ट सिटी प्रकल्पाची बैठक श्री. कुंटे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात काही मुलभूत विषयांवर निर्णय झाले. यासंदर्भात मुख्य सचिव म्हणाले,  शहरातील  ग्रीन फिल्ड प्रक्लाचे प्रस्ताव नगरविकास विभागाकडे आहेत. मात्र  मात्र हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे. `एबीडी` प्रोजेक्टमध्ये शहरात अतिरिक्त रस्ते निर्मितीचे काम करण्यात येत आहे. सध्या कोरोनामुळे `स्मार्ट सिटी`च्या  कामातील गती कमी झाली आहे. नाशिकच्या स्मार्ट सिटीच्या प्रकल्पात आता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी समन्वयक असतील. हा महत्त्वाचा निर्णय झाल्याने या प्रकल्पाच्या कामाला गती येईल. 

कोरोनाबाबत जागरूक रहा 
श्री. कुटे म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत प्रशासनाने गाफील राहू नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन, औषधे आणी बेड याविषया सातत्याने आढावा घेण्यात यावा. त्याबाबत सतर्क राहण्याचे प्रशासकीय यंत्रणांना आदेश आहेत. त्याचा नियमित आढावा घेतला जाईल. त्यातून रुग्णसंख्या नियंत्रणास मदत होईल. 
या बैठकीत नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी स्मार्ट सिटीबाबत विविध सूचना केल्या. `स्मार्ट सिटी` प्रकल्पाला दिलेल्या निधीतील शंभर कोटी रुपये महापालिकेला परत देण्याची मागणी केली. सध्या शहरातील विकासकामे रखडली आहेत. कोविड निर्मूलन व उपायोजनांसाठी, प्रलंबीत कामांना गती देण्यासाठी हा निधी मिळावा असे त्यांनी सांगितले.  

यासंदर्भात आवश्यकतेनुसार निर्णय घेतला जाणार आहे. यावेळी स्मार्ट सिटी प्रकल्पाला दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.  कोविड मुळे हा कालावधी वाढवून देता येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांची बदली करण्यात आली. मात्र ही प्रशासकीय बाब आहे. कामकाज सुरळीत राहण्यासाठी महापालिका प्रशासन व पदाधिकारी यांच्यात समन्वय आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

राज्यात डेल्टा प्लस हा साऊथ आफ्रिकन व्हेरियंट आढळला आहे. त्याचे रुग्ण सध्या नियंत्रणात आहेत. मात्र यासंदर्भात काळजी वाटावी असा हा व्हेरियंट असल्याची केंद्र शासनाची सूचना आहे. राज्यात रुग्णांसाठी  ऑक्सिजन पुरवठा हा आव्हानात्मक विषय आहे. १२ ते १८  वयोगटातील मुलांचे सॅम्पल्स टेस्टिंग केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सुरु केले आहे. यासंदर्भात काळजी घेण्यासाठी गाफील न राहण्याच्या राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना सक्त सूचना दिल्या आहेत. 
...
हेही वाचा...

व्वा माणिकराव, असा साधेपणा नाशिककरांनी पाहिला नव्हता!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख