गावनिहाय `हा` मंत्र आमलात आल्यास कोरोनाचे नियंत्रण? - Village wise committies shall be organise to control Covid-19 | Politics Marathi News - Sarkarnama

गावनिहाय `हा` मंत्र आमलात आल्यास कोरोनाचे नियंत्रण?

संपत देवगिरे
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

कोरोनाच्या नियंत्रणासाठी नागरिकांच्या सहकार्याची जोड हवी. त्यासाठी तालुका, शहर आणि गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांची स्थापना करावी. त्यातून नागरिकांत जनजागृती केल्यास कोरोना नियंत्रणात येईल,

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून तो रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, त्याला नागरिकांच्या सहकार्याची जोड हवी. त्यासाठी तालुका, शहर आणि गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांची स्थापना करावी. त्यातून लोकांत जनजागृती केल्यास कोरोना नियंत्रणात येईल, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत कोरोनाचा आढावा व उपाययोजनांबाबत चांदवड मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथे बैठक झाली. यावेळी चांदवड, देवळा, बागलाण तालुक्यांचा आढावा घेण्यात आला.  यावेळी ते म्हणाले की, कोमॉर्बीड रुग्णांचा शोध घेऊन त्यांची नियमित तपासणी करण्यात यावी. या वर्गातील रुग्णांना योग्य ते औषधोपचार करून त्यावर लक्ष ठेवण्यात यावे. शहरात नव्याने रुग्ण वाढणार नाहीत त्यासाठी सूक्ष्म कंन्टेंनमेन्ट झोनचा वापर करावा. यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी. त्यासाठी तालुका, शहर व गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांची स्थापना करावी. त्यातून जनजागृती करावी. घरोघरी जाऊन तपासणी करावी. 

जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने सुरू झालेल्या शासकीय कोव्हीड टेस्टिंग लॅब मध्ये संशयितांचा स्त्राव पाठवावा, जेणेकरून जलद गतीने अहवाल मिळतील. ज्या तालुक्यामध्ये ऑक्सिजन बेड्स उपलब्ध नसतील त्या ठिकाणी कायमस्वरूपी ऑक्सिजन बेड्सची निर्मिती करण्यात यावी. तसेच येणाऱ्या काळात सटाणा तालुक्यात द्राक्ष बागायतदार यांनी बाहेरून येणाऱ्या व्यापारी लोकांबाबत विशेष काळजी घ्यावी, यासाठी आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी समन्वय राखत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना श्री. भुजबळ यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ. भारती पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, आमदार दिलीप बोरसे, जिल्हा परिषद सदस्य नूतन आहेर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील उपस्थित होते.
....
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख