विखे म्हणतात, कारभार जमत नसेल तर सत्तेतून बाजूला व्हा!

मराठा आरक्षणावरून राज्य सरकारमध्ये विसंवाद असून, सरकारमधील काही घटक समाजात फूट पाडत आहेत. सरकारमधील प्रत्येक जण स्वतंत्र भूमिका मांडत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
Radhakrishna Vikhe patil
Radhakrishna Vikhe patil

नाशिक : मराठा आरक्षणावरून राज्य सरकारमध्ये विसंवाद असून, सरकारमधील काही घटक समाजात फूट पाडत आहेत. सरकारमधील प्रत्येक जण स्वतंत्र भूमिका मांडत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर श्री. विखे-पाटील यांनी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अनेक संघटना कार्यरत आहेत. त्यामुळे स्वतंत्र आंदोलन न करता सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे आरक्षण आंदोलनासंदर्भातील विसंगती दूर होऊन प्रश्‍न सुटेल. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले १६ जूनपासून कोल्हापूरपासून आंदोलनाची सुरवात करणार आहेत. 

श्री. विखे- पाटील म्हणाले, आरक्षणासाठी समाजातील सर्व संघटना, नेत्यांनी एका व्यासपीठावर येऊन सामूहिक नेतृत्व करावे व त्या व्यासपीठावर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी यावे, तसेच त्यांना आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती केली जाणार आहे. सर्वांशी समन्वय साधण्यासाठी आठ दिवसांत बैठक घेणार आहोत. आंदोलनाचे नेतृत्व सामुदायिक असले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. आंदोलनात सहभागी होताना पक्षीय राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, आमदार ॲड. राहुल ढिकले, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, उद्धव निमसे, दिनकर पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
...

...तर बाजूला व्हा
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आंदोलन केले. मात्र, राज्य सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे. इंधनावरील कर कमी केल्यास दर कमी होतील, असा टोला श्री. विखे-पाटील यांनी लगावला. प्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याची फॅशन झाली आहे. सत्ता चालविणे जमत नसेल तर बाजूला व्हा, असा सल्लाही त्यांनी दिला. केंद्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लस मिळत नसल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यावर डोस मिळविण्याची जबबदारी श्री. मुश्रीफ यांच्यावर असल्याचे आजच मला कळाल्याचा टोला त्यांनी लगावला. सध्या श्री. मुश्रीफ ‘गोकुळ’पुरते मर्यादित असल्याने त्यांनी तेवढेच काम करावे, अशी टीकाही त्यांनी केली.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com