विधानसभेवर भगवा फडकणार हे तीस वर्षे एैकतोय! - Vidhansabha, Bhagwa listening since Thirty years | Politics Marathi News - Sarkarnama

विधानसभेवर भगवा फडकणार हे तीस वर्षे एैकतोय!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

प्रत्येक पक्ष आपला विस्तार करीतच असतो. त्यात काहीच गैर नाही.  "विधानसभेवर भगवा फडकणार' ही भाषणे मी गेली तीस वर्षे एैकत आलो आहे. त्यावर एव्हढी चर्चा कशासाठी?, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज येथे म्हणाले.

नाशिक : आघाडीतील एखादा पक्ष स्वतःचे काही संघटनात्मक कार्यक्रम राबवत असेल, तर त्यात फारसे वावगे काही नसते. "विधानसभेवर भगवा फडकणार' ही भाषणे मी गेली तीस वर्षे एैकत आलो आहे. त्यावर एव्हढी चर्चा कशासाठी?, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज येथे म्हणाले. 

खासदार पवार आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दिवंगत ज्येष्ठ नेते विनायक पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी कांदा उत्पादक व व्यापा-यांशी चर्चा केली. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप झाला. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विधानसभेवर स्वबळावर भगवा फडकणार, असे वक्तव्य केले होते. यासंदर्भात श्री पवार यांनी वरील प्रतिक्रीया दिली. 

ते म्हणाले, नुकतेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विधानसभ भगवा फडकणार, असे वक्तव्य केले होते. हा धागा पकडून पत्रकारांनी श्री. पवार यांना विचारले होते. यावेळी ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष राज्यात एकत्र आलो. त्यातून राज्याचा कारभार केला जात आहे. त्याची चांगली फळं दिसत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे या आघाडीतील एखादा पक्ष स्वतःचे काही संघटनात्मक कार्यक्रम राबवत असेल तर त्याबाबत फार मनाला लावून घेण्याचा विषय नसतो. विधानसभेवर भगवा फडकणार हे भाषण मी गेले तीस वर्षे एैकत आलो आहे. त्यावर एव्हढी चर्चा कशासाठी? असा प्रश्‍न त्यांनी केला. 

श्री पवार पुढे म्हणाले, भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस असे आम्ही तीघे एकत्र आलो. त्याची चांगली फळं दिसताहेत, अशी भावना सध्या तिन्ही पक्षांत आहे. याचा अर्थ या पक्षांनी स्वतःचा विस्तार करायचा नाही, असे होत नाही, किंवा आम्ही एकमेकांना सोडलं असाही होत नाही. प्रत्येक पक्षाला संघटनात्मक विस्ताराचा अधिकार आहे. त्यानुसार ते काम करीत असतात. नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काही कार्यक्रम झाले. त्याचा अर्थ आम्ही कॉंग्रेसला सोडले, असा होत नाही. कॉंग्रेसने देखील पक्षविस्तारासाठी काही उपक्रम राबविले तर, त्याचा वेगळा अर्थ निघत नाही, तसेच शिवसेनेने मेळावे घेतले, काही विधाने केली. संघटनात्मक विस्ताराचे कार्यक्रम केले, तर त्याचा अर्थ त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांपेक्षा वेगळा विचार मांडला असा होत नाही. प्रत्येक पक्षाला संघटनात्मक विस्ताराचा. कार्यक्रम राबविण्याचा अधिकार आहे. याबाबत काही बोलायचेच असेल, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात ठरवतील. त्यांनाच याविषयी विचारा. 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख