राज ठाकरेंनी अनुभवला `वी` नेटवर्क जॅमचा फटका ! - VI Network jamm faced by raj Thakre Also | Politics Marathi News - Sarkarnama

राज ठाकरेंनी अनुभवला `वी` नेटवर्क जॅमचा फटका !

संपत देवगिरे
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

दोन दिवसांपूर्वी पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसाने व्होडाफोन- आयडीया यांच्या `वी` नेटवर्कची सेवा कोलमडली. सबंध राज्याला त्याची झळ बसली. अगदी `मनसे` प्रमुख राज ठाकरे यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागला.

नाशिक : दोन दिवसांपूर्वी पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसाने व्होडाफोन- आयडीया यांच्या `वी` नेटवर्कची सेवा कोलमडली. सबंध राज्याला त्याची झळ बसली. अगदी `मनसे` प्रमुख राज ठाकरे यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागला. 

पुणे शहर व परिसरात गुरुवारी मुसळधार परतीचा पाऊस झाला. त्याने विविध सेवांवर परिणाम झाला. या पावसाने व्होडाफोन व आयडीया या नुकत्याच एकत्र आलेल्या मोबाईल नेटवर्कचे केंद्र देखील पुणे शहरच असल्याने त्यांची सेवा खंडीत झाली. याचवेळी राज ठाकरे यांच्या कृष्णकूंज येथील कार्यालयातून नाशिकच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र नेटवर्क जॅम असल्याने त्यांचा संपर्क होत नव्हता. शहरात बहुतांश ग्राहकांकडे `वी` नेटवर्कची सेवा आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांच्याकडे देखील त्याच नेटवर्कची सेवा होती. त्यामुळे त्यांच्यासह पदाधिका-यांचा संपर्कच होत नव्हती. स्वतः राज ठाकरे देखील या पदाधिका-यांशी संपर्क करीत होते. मात्र संपर्क झाला नाही. शेवटी त्यांनी पाटविलेला टेक्स्ट मॅसेज मध्यरात्री १२.३३ वाजता श्री. दातीर यांना मिळाला. एव्हढ्या रात्री स्वतः राज ठाकरे यांचा संदेश मिळाल्याने ते देखील खडबडून जागे झाले. 

राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाशिक शहराच्या सीमेवर वन विभागाच्या उद्यानात साकारलेल्या बॅाटॅनिकल गार्डनची दुरावस्था झाली आहे. त्यातील सुविधा नादुरुस्त झाल्या. विना परवाना हुल्लडबाज तीथे प्रवेश करातात. यांपासून तर विविध तक्रारी थेट राज ठाकरे यांच्याकडे पोहोचल्या होत्या. त्यामुळे सीएसआर फंडातून साकारलेल्या एका चांगल्या प्रकल्पाची वाताहात होत असल्याचे पाहून राज ठाकरेंनी त्याची त्वरीत दखल घेतली. या विषयावर तातडीने महापालिका आयुक्तांना सजग करुन कार्यवाही करण्यासाठी पक्षाच्या पदाधिका-यांनी पुढाकार घ्यावा, असा निरोप त्यांना द्यायचा होता. मात्र नेटवर्क जॅम असल्याने त्यांचा संपर्क झालाच नाही. ही माहिती मिळाल्यावर नाशिकचे पदाधिकारीही चांगलेच अस्वस्थ झाले होते. 

...

`मनसे` प्रमुख राज ठाकरे दिवसभर निरोप देण्यासाठी पक्षाच्या पदाधिका-यांशी संपर्क करीत होते. मात्र नेटवर्क जॅम असल्याने नाशिकची संपर्क सेवा खंडीत झाली होती. मला मध्यरात्री १२.३३ वाजता त्यांचा संदेश मिळाल्यावर त्याचा उलगडा झाला. - दिलीप दातीर, जिल्हा प्रमुख, मनसे.
...

https://scontent.fpnq1-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख