राष्ट्रवादीचे भुजबळ आणि शिवसेना आमदारात जोरदार चकमक 

बैठक आटोपून भुजबळ बाहेर जात असतांना आमदार सुहास कांदे यांच्या समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली.
 Chhagan Bhujbal, Suhas Kande .jpg
Chhagan Bhujbal, Suhas Kande .jpg

मनमाड : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा आज (ता. ११ सप्टेंबर) नांदगाव पूरग्रस्त पाहणी दौरा वादळी ठरला. सदर दौरा झाल्यानंतर नांदगाव तहसील कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैठकीत आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या शाब्दिक चकमकीमुळे बैठकीत गोंधळ उडाला तर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. आपत्कालीन निधी मिळालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका आमदार सुहास कांदे यांनी घेतली. (Verbal feud between Chhagan Bhujbal and Suhas Kande)  

नांदगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा नांदगाव दौरा होता. पाहणी दौरा आटोपून तहसील कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नांदगाव मतदारसंघात पावसाने हाहाकार घालीत मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. 

त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेला आपत्कालीन निधी द्यावा, अशी मागणी आमदार सुहास कांदे यांनी केली असता हा पालकमंत्र्यांचा अधिकार आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे भुजबळ यांनी सांगताच दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडत खडाजंगी झाली. त्यामुळे उपस्थितांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते तर बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

शेती नुकसानीचे शंभर टक्के पंचनामे करावे यासाठी आमदार कांदे आग्रही होते. बैठक आटोपून भुजबळ बाहेर जात असतांना आमदार सुहास कांदे यांच्या समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. पालकमंत्री छगन भुजबळ हे दिशाभूल करीत असून राज्यात कोल्हापूर व सांगली येथे ज्या प्रमाणे आपत्कालीन निधी देण्यात आला आहे. त्याप्रमाणे नांदगाव तालुक्याला निधी द्यावा. मात्र, पालकमंत्री भुजबळ हे दुजाभाव करीत आहे, असा आरोप कांदे यांनी केला. नुकसानीचे शंभर टक्के पंचनामे न केल्यास उपविभागीय अधिका-यंच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा कांदे यांनी दिला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com