रक्षा खडसे-चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये शाब्दीक चकमक  - Verbal clash between Raksha Khadse and Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

रक्षा खडसे-चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये शाब्दीक चकमक 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

खासदार रक्षा खडसे या लवकर आल्या आणि त्यांनी कापूस खरेदी केंद्राचे उदघाटन करून भाषणही करून मोकळ्या झाल्या.

बोदवड : रावेर लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे आणि मुक्ताईनगर-बोदवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्यात एका कार्यक्रमात व्यासपीठावरच शाब्दीक चकमक उडाली. आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार असून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. ते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव करून मुक्ताईनगर मतदार संघातून विजयी झाले आहेत. 

बोदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय सीसीआय कापूस खरेदी केंद्राचा उदघाटनाचा कार्यक्रम गुरुवारी (ता. 19 नोव्हेंबर) सकाळी दहाला आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास आमदार चंद्रकांत पाटील व खासदार रक्षा खडसे या दोन्हीही लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, खासदार रक्षा खडसे या लवकर आल्या आणि त्यांनी कापूस खरेदी केंद्राचे उदघाटन करून भाषणही करून मोकळ्या झाल्या. त्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील कार्यक्रमस्थळी दाखल झाले. 

या वेळी आपल्या भाषणात त्यांनी कार्यक्रमाचे उदघाटन आटोपून घेतल्याच्या प्रकारावर आक्षेप घेत कार्यक्रम असल्याने अर्धा तास वेळ झाला. लोकप्रतिनिधींनी अर्धा तास तरी वाट बघायला हवी होती, असे बोलून त्यांनी खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. 

त्याच वेळी खासदार खडसे यांनीही तेथेच आमदार पाटील यांना सांगितले की, अर्धा तास वाट बघितली तरीही आपणास उशीर होत असल्याने आणि पुढे इतरही कार्यक्रम असल्याने कार्यक्रमास सुरवात केल्याचे सांगितले. त्यावर चंद्रकात पाटील यांनी टोला लगावला. ते म्हणाले, "मला आधीच सांगितले असते, तर तुम्हीच घेतला असता कार्यक्रम. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख