वसंत गितेंचे यश, ३२७ जणांना मिळाले प्रत्येकी दहा हजार! - Vasant Gite`s initiative for PM Scheme relief of 10K | Politics Marathi News - Sarkarnama

वसंत गितेंचे यश, ३२७ जणांना मिळाले प्रत्येकी दहा हजार!

संपत देवगिरे
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार वसंत गिते यांनी नेत्यांचा संदेश प्रत्यक्षात आनला. त्यांच्या प्रयत्नाने शहरातील ३२७ लहान व्यवसायिकांना पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेचे दहा हजारांचे अनुदान मिळाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाने त्रस्त हातावरच्या या विक्रेत्यांकडून श्री. गिते यांचे आभार मानन्यात आले. 

नाशिक : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार वसंत गिते यांनी नेत्यांचा संदेश प्रत्यक्षात आनला. त्यांच्या प्रयत्नाने शहरातील ३२७ लहान व्यवसायिकांना पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेचे दहा हजारांचे अनुदान मिळाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाने त्रस्त हातावरच्या या विक्रेत्यांकडून श्री. गिते यांचे आभार मानन्यात आले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते अमित शहा सातत्याने सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहन करीत असतात. मात्र फार थोडे नेते त्याचे अनुकरण करतात. येथील माजी महापौर, माजी आमदार वसंत गिते आणि त्यांचे पुत्र माजी प्रथमेश गिते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र हा संदेश कृतीत उतरवला युवक व मतदारांशी जोडले गेले आहेत. सामान्यांतील जागरुक व संवेदनशील कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा आहे. श्री. गिते गेले पंचेचाळीस वर्षे सामाजिक, राजकीय उपक्रमांद्वारे सामान्य नागरिक, 

त्यासाठी त्यांनी विविध प्रयत्न केले. गेले दिड महिन्यापासून नाशिक शहरात पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेची नोंदणी विविध ठिकाणी त्यांनी सुरु केली. या योजनेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी सर्व सुविधायुक्त गाडी त्यांनी तयार केली. शहरातील मुंबई नाका, रविवार कारंजा, आकाशवाणी केंद्र, भाजीमार्केट परिसर, गांधी नगर मार्केट या ठिकाणी ते स्वतः तसेच कार्यकर्ते गेले. त्याद्वारे त्यांनी या नागरिकांना अर्थात लहान विक्रेते, गरीब व हातगाडीवर व्यवसाय करणारे, लहान व्यावसायिकांकडून केली. या मोहिमेत त्यांनी साडे तीन हजार जणांचे अर्ज भरुन घेतले. यातील ३२७ जणांचे अर्ज पहिल्या टप्प्यात मंजूर झाले असून त्यांना दहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. हे अनुदान त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. 

कोरोनामुळे देशात लॅाकडाऊन करण्यात आले. विविध व्यवसाय त्यामुळे बंद ठेवावे लागले. या व्यवसायिकांनी पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेतून दहा हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. त्यानुसार श्री. गिते यांनी योजनेचे अर्ज तयार केले. ते भरुन घेतल्यावर ते इंटरनेटद्वारे सरकारला पाठविले. त्याचा पाठपुरावा केला. त्याला यश आले. त्यामुळे अडचणीत असलेल्या या व्यवसायिकांनीही आनंद व्यक्त केला. या धनादेशांचे वाटप वसंत गिते यांनी केले. आज यासंदर्भात झालेल्या कार्यक्रमास सोमनाथ शेलार, अनिता गायकवाड, स्वराज गाडे, अक्रम शेख, शकीला शेख आदींसह माजी उपमहापौर प्रथमेश गिते, विनोद गाडे, वाल्मिक मोटकरी, संजय कांबळे, सुनील वझरे, संजय वाघ आदींसह मुंबई नाका युवक मित्र मंडळाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते .
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख