पंढरपूर पायी वारीसाठी वारकरी प्रयत्न करणार - Varkari expect permission for pandharpur wari, Varkari Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

पंढरपूर पायी वारीसाठी वारकरी प्रयत्न करणार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 जून 2021

दर वर्षी निवृत्तिनाथांची पालखी पंढरपूरला आषाढी एकादशीला पायी जात असते. गतवर्षीपासून कोरोना महामारीने या वारीत खंड पडला आहे. गेल्या वर्षी शिवशाही बसने मोजक्या वारकऱ्यांनी ही वारी केली. अगदी बस निघण्याच्या वेळेपर्यंत वादविवाद सुरू होते. या वर्षी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार असल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली.

नाशिक : दर वर्षी निवृत्तिनाथांची पालखी पंढरपूरला आषाढी एकादशीला पायी जात असते. (Every year Sent Nivruttinath Palkhi goes by road to Pandharpur) गतवर्षीपासून कोरोना महामारीने या वारीत खंड पडला आहे. (This yaer that Tradition break due to covid lockdown restricions) गेल्या वर्षी शिवशाही बसने मोजक्या वारकऱ्यांनी ही वारी केली. अगदी बस निघण्याच्या वेळेपर्यंत वादविवाद सुरू होते. या वर्षी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार असल्याची भावना वारकऱ्यांनी (Varkari Deemands) व्यक्त केली.

ज्ञानेश्वरांचे गुरू व ज्येष्ठ बंधू निवृत्तिनाथ यांच्या पालखीबाबतही दरवेळी भेदभाव केला जातो, अशी भाविकांची भावना आहे.या वर्षी २० जुलै वारीचा मुख्य दिवस आहे. १९ ला पन्नास मानकरी व वारकरी घेऊन दोन बसने जाऊन ही वारी संपन्न केली होणार आहे. तत्पूर्वी २४ जूनला मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा गतवर्षीच्या धर्तीवर प्रातिनिधिक स्वरुपात समाधी मंदिराच्या आवारात होईल. तेथे रोज पंढरपूरला वारीसाठी जाण्यासाठी वाटेत सकाळ व सायंकाळी होणारी पूजा व आरती होईल, असे पूजक जयंत गोसावी यांनी सांगितले. या मंदिराचा कारभार सध्या प्रशासक पाहत असून, धर्मादाय आयुक्त कृष्णा सोनवणे, ॲड. भाऊसाहेब गंभीरे, पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे व मुख्याधिकारी संजय जाधव पाहात आहेत.

वारी प्रस्थान करण्यासाठी व्यवस्था व त्यातील व्यक्तींच्या सहभागाची यादी निश्चित करण्यासाठी लवकरच बैठक होईल व वारकरी भक्तांची भक्तीची वारी होईल, ती हौशी लोकांची नसेल, असे ॲड. गंभीरे यांनी सांगितले.
...
हेही वाचा...

कुंभारीचे सरपंच राजेंद्र जाधव यांचे असेही दातृत्व...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख